निवडणूक लढवायची का? चंद्राबाबूंचे नेते पेचात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 05:33 AM2023-10-18T05:33:39+5:302023-10-18T05:33:52+5:30
यादी पक्षश्रेष्ठींकडे पाठविली असून त्यांच्याकडून अद्याप काहीही उत्तर मिळालेले नाही.
हैदराबाद : आगामी विधानसभा निवडणुका लढण्याबाबत तेलुगू देसम पक्ष (टीडीपी) द्विधा मनस्थितीत आहे. पक्षाने आपल्या ८८ उमेदवारांची यादी पक्षश्रेष्ठींकडे पाठविली असून त्यांच्याकडून अद्याप काहीही उत्तर मिळालेले नाही. पक्षाचे अध्यक्ष व माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू तुरुंगवासात आहेत त्यामुळे या पक्षाचे तेलंगणातील कार्यकर्ते, नेते बुचकळ्यात पडले आहेत.
धक्कादायक घटना घडण्याची शक्यता
तेलुगू देसम पक्षाचे रावुला चंद्रशेखर रेड्डी यांच्यासारखे नेते भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. या पक्षाचे तेलंगणाचे माजी प्रदेशाध्यक्ष बक्कानी नरसिंहुलू यांना आपल्या राजकीय भविष्याची चिंता असल्याने तेही वेगळा निर्णय घेण्याची शक्यता आहे. तेलंगणातील विधानसभा निवडणुका लढवायच्या की नाही याबाबत पक्षश्रेष्ठींनी निर्णय घेतल्यानंतर पक्षामध्ये अनेक धक्कादायक घटना घडतील, अशी राजकीय निरीक्षकांना शक्यता वाटते.