जैश-ए-मोहम्मदच्या वाँटेड दहशतवाद्याला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2019 11:33 AM2019-04-01T11:33:37+5:302019-04-01T12:27:05+5:30

जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथून जैश-ए-मोहम्मदचा वाँटेड दहशतवादी फैय्याज अहमद लोनला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.

Wanted JeM terrorist carrying Rs 2 lakh reward, arrested in Srinagar | जैश-ए-मोहम्मदच्या वाँटेड दहशतवाद्याला अटक

जैश-ए-मोहम्मदच्या वाँटेड दहशतवाद्याला अटक

googlenewsNext
ठळक मुद्देजम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथून जैश-ए-मोहम्मदचा वाँटेड दहशतवादी फैय्याज अहमद लोनला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला जैशच्या दहशतवाद्याला पकडण्यात यश आले.दिल्ली पोलिसांनी फैय्याज अहमद लोनवर दोन लाखांचे बक्षीस ठेवले होते.

नवी दिल्ली - जम्मू-काश्मीरमधील श्रीनगर येथून जैश-ए-मोहम्मदचा वाँटेड दहशतवादी फैय्याज अहमद लोनला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलला जैशच्या दहशतवाद्याला पकडण्यात यश आले आहे. 

दिल्ली पोलिसांनी फैय्याज अहमद लोनवर दोन लाखांचे बक्षीस ठेवले होते. फैय्याज 2015 पासून फरार असून त्याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावण्यात आले होते. काही दिवसांपूर्वीच जैश-ए-मोहम्मदचा कमांडर व पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड मुदस्सीर अहमदचा साथीदार सज्जाद खानला दिल्लीतून अटक करण्यात आली होती. पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा पथकं आणि तपास यंत्रणांनी जैश-ए-मोहम्मद विरोधातील आपली मोहिम अधिक तीव्र केली आहे.


भारतीय सैन्याकडून लष्कर-ए-तोएबाच्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा

पुलवामा येथील लस्सीपुरा भागात पहाटेपासून सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं असून दहशतवाद्यांकडून अनेक हत्यारे जप्त करण्यात आल्याची माहिती आहे. 

लष्कर ए तोएबाच्या 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. मृत दहशतवाद्यांकडून 2 एके रायफल्स, 1 एसएलआर आणि 1 पिस्तूल जप्त करण्यात आली असून परिसरामध्ये लष्कराकडून शोधमोहीम सुरुच आहे. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 3 जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

दोन दिवसांपूर्वी दहशतवाद्यांकडून पुलवामाच्या त्राल परिसरात गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये एका सामान्य नागरिकाला दहशतवाद्याने गोळी मारल्याने तो गंभीर जखमी झाला होता. या घटनेनंतर संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मंजूर अहमद हजाम असं या जखमी नागरिकाचे नावं आहे. 

महिनाभरापूर्वी दहशतवाद्यांकडून पुलवामा येथे सीआरपीएफच्या जवानांवर हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यांमध्ये सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. सीआरपीएफ जवानांचा हा ताफा जम्मूवरुन श्रीनगरला जात होता. त्यावेळी दहशतवाद्यांकडून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती. यानंतर भारतीय हवाई दलाकडून एअर स्ट्राईक करत बालकोट परिसरातील जैश ए मोहम्मदच्या दहशतवादी तळांना टार्गेट करण्यात आलं होतं. 

 

Web Title: Wanted JeM terrorist carrying Rs 2 lakh reward, arrested in Srinagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.