‘वक्फ सुधारणा’ विधेयक आज लोकसभेत, सभागृहात होणार आठ तास चर्चा; विरोधक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 07:00 IST2025-04-02T06:58:41+5:302025-04-02T07:00:28+5:30

'Waqf Board Amendment' Bill : विधेयक लोकसभेमध्ये बुधवारी चर्चेसाठी येणार आहे. त्याला विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध होणार आहे. या विधेयकावर सभागृहात सुमारे आठ तास चर्चा होणार असून नंतरवक्फ सुधारणा, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू हे उत्तर देतील, असे सूत्रांनी मंगळवारी सांगितले.

'Waqf Board Amendment' Bill in Lok Sabha today, debate to last for eight hours in House; Opposition aggressive | ‘वक्फ सुधारणा’ विधेयक आज लोकसभेत, सभागृहात होणार आठ तास चर्चा; विरोधक आक्रमक

‘वक्फ सुधारणा’ विधेयक आज लोकसभेत, सभागृहात होणार आठ तास चर्चा; विरोधक आक्रमक

 नवी दिल्ली - विधेयक लोकसभेमध्ये बुधवारी चर्चेसाठी येणार आहे. त्याला विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध होणार आहे. या विधेयकावर सभागृहात सुमारे आठ तास चर्चा होणार असून नंतरवक्फ सुधारणा, केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू हे उत्तर देतील, असे सूत्रांनी मंगळवारी सांगितले. त्यानंतर हे विधेयक मंजूर करण्यासाठी मतदान घेतले जाण्याची शक्यता आहे. 

आपला अजेंडा लादण्याचा केंद्राचा प्रयत्न : काँग्रेस 
लोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी सांगितले की, केंद्र सरकार आपला अजेंडा सर्वांवर लादण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे विरोधक लोकसभा कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीतून निघून गेले.     - 

लोकसभेत दुपारी 
१२ वाजता हे विधेयक चर्चेसाठी ठेवले जाईल, गुरुवारी राज्यसभेत हे विधेयक सादर होईल.   

दोन्ही सभागृहांमध्ये संख्याबळाचे गणित
                                      लोकसभा     राज्यसभा
एकूण खासदार                 ५४३          २३६
बहुमतासाठी आवश्यक     २७२         ११९
एनडीए                             २९३          १२१
इंडिया                              २३५          ८५
अन्य                                  १५            ३०
(लाेकसभेत टीडीपी-जदयूच्या २८ खासदारांवर अवलंबून)
(राज्यसभेत ६ नामनिर्देशित खासदारांच्या पाठिंब्यावर अवलंबून)

Web Title: 'Waqf Board Amendment' Bill in Lok Sabha today, debate to last for eight hours in House; Opposition aggressive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.