आंध्रात वक्फ मंडळ बरखास्त; मंडळावर नव्याने सदस्यांची नियुक्ती करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2024 05:25 IST2024-12-02T05:24:57+5:302024-12-02T05:25:25+5:30
या वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. यादरम्यान राज्य वक्फ बोर्डाच्या स्थापनेसाठी २०२३मधील सरकारी आदेशाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका प्रलंबित होत्या.

आंध्रात वक्फ मंडळ बरखास्त; मंडळावर नव्याने सदस्यांची नियुक्ती करणार
अमरावती : आंध्र प्रदेश सरकारने राज्य वक्फ बोर्ड बरखास्त केले असून पूर्वीच्या जगनमोहन रेड्डी सरकारने या मंडळाची स्थापना केली होती. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील सरकारने ३० नोव्हेंबर रोजी याबाबतचा आदेश काढला आहे.
या वक्फ बोर्डाच्या अध्यक्षपदासाठी होणाऱ्या निवडणुकीला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. यादरम्यान राज्य वक्फ बोर्डाच्या स्थापनेसाठी २०२३मधील सरकारी आदेशाच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिका प्रलंबित होत्या. आता या मंडळावर नव्याने नियुक्त्या केल्या जातील.
दरम्यान, विधि व न्याय तसेच अल्पसंख्याक कल्याण मंत्री एन. माेहम्मद फारुख यांनी हा निर्णय वक्फ मंडळाच्या मालमत्तांचे संरक्षण आणि या समुदायाच्या कल्याणाच्या दृष्टीने घेण्यात आला असल्याचे म्हटले आहे.