१९६५ चे युद्ध पाकसाठी दु:साहस ठरले!
By admin | Published: September 2, 2015 12:52 AM2015-09-02T00:52:59+5:302015-09-02T00:52:59+5:30
१९६५ चे युद्ध पाकिस्तानसाठी अतिशय महागडे लष्करी आणि राजकीय दु:साहस ठरले होते, असे सांगून उपराष्ट्रपती डॉ. हामीद अन्सारी यांनी त्या युद्धातील शेजारी देशाचे आक्रमण
नवी दिल्ली : १९६५ चे युद्ध पाकिस्तानसाठी अतिशय महागडे लष्करी आणि राजकीय दु:साहस ठरले होते, असे सांगून उपराष्ट्रपती डॉ. हामीद अन्सारी यांनी त्या युद्धातील शेजारी देशाचे आक्रमण हाणून पाडल्याबद्दल माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे नेतृत्व आणि काश्मिरी जनतेची प्रशंसा केली.
१९६५ च्या युद्धाच्या सुवर्ण जयंतीच्या निमित्ताने आयोजित केलेला स्मृती कार्यक्रम ही आमच्या जवानांच्या बलिदान आणि शौर्याप्रती व्यक्त केलेली उचित श्रद्धांजली आहे, असे अन्सारी म्हणाले. १९६५ च्या युद्धाला ५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात ते बोलत होते.
ज्या घटनाक्रमांमुळे हे युद्ध झाले होते, तो घटनाक्रम भारतीय उपखंडाचा भूगोल व राजकीय वास्तविकता बदलण्यासाठी आपण बळाचाही वापर करू शकतो, या पाकचा हेकेखोरपणा आणि भ्रामक विश्वासाचे निदर्शक आहे. विश्लेषण केले तर हे युद्ध पाकिस्तानसाठी लष्करी आणि राजकीय दु:साहस ठरले होते, असे दिसते.