मोदी-शहांविरुद्धच्या लढाईत 'आप'ण जिंकलो, मी पराभूत नसून 'शहीद' 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2020 06:05 PM2020-02-12T18:05:47+5:302020-02-12T18:08:12+5:30

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2020मध्ये पुन्हा एकदा मोठा विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे

In the war against Modi-Shah, I am not lost, i am martyr, says durgesh pathak AAP in delhi election | मोदी-शहांविरुद्धच्या लढाईत 'आप'ण जिंकलो, मी पराभूत नसून 'शहीद' 

मोदी-शहांविरुद्धच्या लढाईत 'आप'ण जिंकलो, मी पराभूत नसून 'शहीद' 

Next

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाच्या 8 उमेदवारांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामध्ये, करावलनगर मतदारसंघातील केजरीवाल यांचे विश्वासू आणि निकटवर्तीय दुर्गेश पाठक पराभूत झाले आहेत. मात्र, पराभवानंतरही त्यांनी कार्यकर्ते आणि सहकारी मित्रांना मोठा धीर दिला. विशेष म्हणजे, पराभवानंतरही त्यांनी मोठ्या हिंमतीने भाषण करत, मी जरी हरलो तरी 'आप'ण जिंकलो हे महत्वाचं असल्याचं दुर्गेश यांनी म्हटलंय. 

आपली लढाई ही मोदी आणि अमित शहा यांच्याविरोधात होती. आपली लढाई ही दोन विचारांची लढाई होती. लढाई लढताना काही सैनिक शहीद होत असतात, शहीद सैनिकांचं दु:ख न बाळगता त्यांचा अभिमान-गर्व बाळगला पाहिजे, असे दुर्गेश यांनी म्हटले. कारण, सैनिक जरी शहीद झाले तरी आपण लढाई जिंकली आहे. मोदी अन् शहा यांचा चांगलाच हिसका दाखवलाय, असेही त्यांनी म्हटले. 
आपण या पराभवाचा नक्कीच बदला घेऊ, दोन वर्षांनी आणखी एक निवडणूक होईल, त्यावेळी पाचही जागा जिंकायच्या आहेत. आता, त्याच काम आपल्याला करायचंय. मी जरी पराभूत झालो असलो तरी, मी तुम्ही म्हणाल तिथं काम करणार. आमदार असो किंवा नसो तुमच्यासाठी सर्वकाही करेल, असे म्हणत दुर्गेश यांनी कार्यकर्त्यांचं मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला.    

दिल्ली विधानसभा निवडणुकीत 2020मध्ये पुन्हा एकदा मोठा विजय मिळवल्यानंतर आम आदमी पार्टीचे अरविंद केजरीवाल 16 फेब्रुवारीला मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. दिल्लीतल्या रामलीला मैदानात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत केजरीवाल मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यामुळे, केजरीवाल तिसऱ्यांदा दिल्लीच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होणार आहेत.  दिल्ली विधानसभा निवडणुकी 2015च्या निवडणुकांसारखाच यंदाही आपने मोठा विजय मिळवला. आपनं 62 जागांवर विजय मिळवलेला असून, गत निवडणुकीच्या तुलनेत 5 जागा कमी झालेल्या आहेत. भाजपाला या निवडणुकीत 8 जागाच राखता आल्या. तर काँग्रेसच्या 67 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालेलं आहे. निवडणूक निकालाचं विश्लेषण करताना मनिष सिसोदिया यांनी भाजपवर शरसंधान साधले. 
 

Web Title: In the war against Modi-Shah, I am not lost, i am martyr, says durgesh pathak AAP in delhi election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.