नक्षलवादावर अखेरचा वार, केंद्राने आखली रणनिती; 4000 CRPF जवान निघाले निर्णायक लढाईला

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2024 09:05 PM2024-09-08T21:05:01+5:302024-09-08T21:05:16+5:30

War against naxalite : काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देशातील नक्षलवादाचा नायनाट करण्याची घोषणा केली आहे.

War against naxalite The final blow to the naxalites, the strategy planned by the center; 4000 CRPF jawans leave for decisive battle | नक्षलवादावर अखेरचा वार, केंद्राने आखली रणनिती; 4000 CRPF जवान निघाले निर्णायक लढाईला

नक्षलवादावर अखेरचा वार, केंद्राने आखली रणनिती; 4000 CRPF जवान निघाले निर्णायक लढाईला

War against naxalite : येत्या दोन वर्षात देशातून नक्षलवाद्यांचा समूळ नायनाट केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी 15 दिवसांपूर्वी केली होती. या दिशेने केंद्रानेही आपली पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) हजारो सैनिक छत्तीसगडला पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. नक्षलवाद्यांचा खात्मा करणे, हे एकच ध्येय त्यांचे असेल.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या महिन्यात छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये नक्षलवाद्यांना अंतिम मुदत जाहीर करताना, देशाला डाव्या विचारसरणीपासून मुक्त करण्यासाठी 'मजबूत आणि निर्दयी' कृती आवश्यक असल्याचे म्हटले होते. त्यानुसार, छत्तीसगडमधील सर्वाधिक नक्षल-हिंसाग्रस्त भाग असलेल्या बस्तरमध्ये सीआरपीएफ 4,000 हून अधिक जवानांसह चार बटालियन तैनात करणार आहे. मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद्यांना संपवण्याच्या केंद्र सरकारच्या घोषणेनंतर आता अखेरचा निर्णायक लढा सुरू झाला आहे. 

अधिकृत सूत्रांनी सांगितले की, केंद्रीय राखीव पोलीस दलाने (CRPF) झारखंडमधून तीन आणि बिहारमधून एक बटालियन परत बोलावली आहे. राज्याची राजधानी रायपूरच्या दक्षिणेस सुमारे 450 ते 500 किलोमीटर अंतरावर असलेल्या बस्तर भागात या तुकड्या तैनात केल्या जातील. या दोन राज्यांमध्ये (झारखंड आणि बिहार) नक्षलवादी कारवाया बंद किंवा नगण्य झाल्या आहेत. त्यामुळे या बटालियनचा छत्तीसगडमध्ये अधिक चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो. विशेष म्हणजे, सीआरपीएफच्या एका बटालियनमध्ये सुमारे एक हजार जवान आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, छत्तीसगडमधील दंतेवाडा आणि सुकमा या दुर्गम जिल्ह्यांमध्ये, तसेच ओडिशा, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्याच्या त्रि-सीमेवरील दुर्गम ठिकाणी या तुकड्या तैनात केल्या जात आहेत. सीआरपीएफच्या कोब्रा युनिट्ससह या बटालियन जिल्ह्यांच्या दुर्गम भागात अधिक फॉरवर्ड ऑपरेटिंग बेस (एफओबी) स्थापन करतील, जेणेकरून क्षेत्र सुरक्षित केल्यानंतर विकास कार्य सुरू करता येईल. या नवीन युनिट्सना चिलखती वाहने, UAVs (मानवरहित हवाई वाहने), श्वानपथक, दळणवळण संच आणि रेशन पुरवठ्याद्वारे रसद सहाय्य प्रदान केले जात आहे.

Web Title: War against naxalite The final blow to the naxalites, the strategy planned by the center; 4000 CRPF jawans leave for decisive battle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.