लालूंवरून भाजपमध्येच ‘वॉर’
By admin | Published: May 23, 2017 06:58 AM2017-05-23T06:58:18+5:302017-05-23T06:58:18+5:30
भाजपचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा आणि बिहारमधील विरोधी पक्षनेते सुशीलकुमार मोदी यांच्यात टिष्ट्वटर वॉर सुरू झाले आहे. निमित्त आहे
पाटणा : भाजपचे ज्येष्ठ नेते शत्रुघ्न सिन्हा आणि बिहारमधील विरोधी पक्षनेते सुशीलकुमार मोदी यांच्यात टिष्ट्वटर वॉर सुरू झाले आहे. निमित्त आहे लालूप्रसाद यादव आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्धच्या भ्रष्टाचाराच्या आरोपाचे.
शत्रुघ्न सिन्हा यांनी टष्ट्वीट केले आहे की, ‘केजरीवाल, लालूप्रसाद यादव आणि सुशीलकुमार मोदी यांच्याविरुद्ध नकारात्मक राजकारण आणि चिखलफेक खूप झाली. आपले आरोप सिद्ध करा किंवा पॅकअप करा. मीडियाला सनसनाटी आणि एका रात्रीच्या स्टोरी पुरविणे बंद करा.’
बिहारमधून लोकसभा सदस्य असलेले शत्रुघ्न सिन्हा यांनी टष्ट्वीट केले आहे की, विश्वासार्हता, संघर्ष आणि समाजाप्रति असलेली बांधिलकी यासाठी मी केजरीवाल यांचा सन्मान करतो.
आमचा पक्ष भाजप प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता यावर विश्वास ठेवतो; पण हे दोन गुण कधीतरीच एकत्र असतात. जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत एक आरोप हा फक्त आरोपच असतो.
लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबावर एक हजार कोटी रुपयांच्या बेहिशेबी संपत्तीचा आरोप करणारे सुशीलकुमार यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्या टष्ट्वीटवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी टष्ट्वीट केले आहे की, ज्या लालूंच्या बेहिशेबी संपत्तीच्या बचावासाठी नितीशकुमार पुढे आले नाही तिथे बचावासाठी भाजपचे ‘शत्रू’पुढे आले आहेत. शक्य तेवढ्या लवकर अशा गद्दारांना बाहेरचा रस्ता दाखवायला हवा.