मोदींच्या एका शब्दावर युद्ध थांबवलेले, आज पुन्हा मदतीला धावला; भारताच्या खऱ्या मित्रांपैकी एक...सौदी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2023 11:57 PM2023-04-26T23:57:19+5:302023-04-26T23:58:00+5:30
गोष्ट २०१५ ची आहे. सौदी अरेबियाने येमेनविरोधात युद्ध छेडले होते. तेव्हा येमेनमधून भारताने 5600 लोकांना बाहेर काढले होते.
सुदानमध्ये सुरु असलेल्या गृहयुद्धामध्ये हजारो भारतीय नागरीक अडकले आहेत. यापैकी काही भारतीयांवा घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान भारतात दाखल झाले आहे. भारतीय नौदलाने सुदानमध्ये ७२ तासांच्या सीझफायरमध्ये आपल्या युद्धनौका पाठविल्या आहेत. भारतीय नागरिकांना य़ा युद्धनौकांमधून जेद्दाहला आणले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या एका शब्दावर युद्ध थांबवणारा, अवघ्या जगाला आपल्या तालावर नाचवू शकणारा देश सौदी आज पुन्हा एकदा भारतीयांच्या मदतीला धावून आला आहे.
गोष्ट २०१५ ची आहे. सौदी अरेबियाने येमेनविरोधात युद्ध छेडले होते. तेव्हा येमेनमधून भारताने 5600 लोकांना बाहेर काढले होते. यात 4640 भारतीय तर अन्य लोक हे ४१ देशांचे होते. येमेनमधील परिस्थिती भीषण होती. भारत सरकारने सौदीच्या राजाकडे एक शब्द टाकला, आम्हाला आमच्या लोकांना बाहेर काढुदे...तेव्हा परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज होत्या. त्यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितलेले तेव्हा कसे मोदींच्या शब्दाखातर सौदीने युद्ध थांबविले होते.
येमेनच्या आकाशातून बॉम्बवर्षाव होत होता आणि साडे चार हजार भारतीयांचा जीव धोक्यात होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परराष्ट्र दौरे केले त्यावर टीका केली जाते, परंतू त्यातून काय मिळविले, असा सवाल सुषमा यांनी केला होता. समुद्रात लुटारू टपून बसलेले होते, आकाशातून बॉम्बचा पाऊस पडत होता. तिन्ही रस्ते बंद होते. अशावेळी मोदींनी ऑस्ट्रेलियात सौदीच्या राजांपैकी एक सुलमान बिन अब्दुल अजीज यांच्याशी चर्चा केल्याचे मला आठवले होते. मी लगेचच मोदींकडे गेले आणि त्यांना फोन लावायला सांगितला. सौदीच्या राजासोबत त्यांची चांगली मैत्री होती. फक्त सात दिवसांसाठी युद्धा थांबवा, असे सांगण्यास सांगितले. मोदींनी लगेचच सौदीच्या राजाला फोन केला आणि सात दिवसांत भारतीयांना बाहेर काढण्याचा मनसुबा सांगितला.
सौदीच्या सुल्तानाने या प्रस्तावावर मोदींकडे एका तासाची वेळ मागितली. युद्ध थांबवायचे म्हणजे सौदीसाठी मोठा धोका होता. दुष्मन या काळात त्याची ताकद वाढविण्याची तयारी करू शकत होता. बरोबर एक तास होत नाही तोच सौदीच्या राजाने फोन केला. त्याने सात दिवस नाही परंतू रोज दोन तास आम्ही युद्ध थांबवू, हे पुढील एक आठवडा करू, असे सांगितले.
मोदींनी सुषमांना दोन तासांत आपल्याला सर्व तयारी करायची असल्याचे सांगितले. भारतीयांना दोन तासासाठी विमानतळाचे रस्ते खोलण्याचे सौदीने आदेश आपल्या सैन्याला दिले. मोदींना यासाठी निवृत्त जनरल मंत्री वीके सिंह यांना येमेनला पाठविले. भारताने फक्त भारतीयांनाच नाही तर अमेरिका, इंग्लैंड, फ्रांस आणि जर्मनीसारख्या नागरिकांनाही येमेनच्या बाहेर आणले.