वारकर्‍यांना सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर

By admin | Published: June 8, 2016 01:50 AM2016-06-08T01:50:36+5:302016-06-08T01:50:36+5:30

खास वाहन तैनात करणार : प्रत्येक दिंडीला उघडावे लागणार बँक खाते

Warcars gas cylinders at discounted rates | वारकर्‍यांना सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर

वारकर्‍यांना सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर

Next
स वाहन तैनात करणार : प्रत्येक दिंडीला उघडावे लागणार बँक खाते
पुणे : आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होणार्‍या दिंड्यांना अखेर सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याचा निर्णय मंगळवारी विभागीय आयुक्त कार्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
या बैठकीमध्ये प्रत्येक दिंडीला पालखी सोहळा कालावधीत किमान ८ ते १० गॅस सिलिंडरचा पुरवठा करण्याचे तिन्ही गॅस कंपन्यानी मान्य केले. यासाठी पालखी मार्गावर सिलिंडर पुरवण्यासाठी खास वाहन तैनात करण्यात येणार आहे. सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर मिळण्यासाठी प्रत्येक दिंडीला आपले बँक खाते उघडावे लागणार आहे.
केंद्र शासनाने गेल्या दोन वर्षांपासून गॅस सिलिंडरसाठी देण्यात येणारे अनुदान थेट संबंधित ग्राहकांच्या बँक खात्यात जमा करण्यास सुरुवात केली आहे. तसेच अनुदान जमा होणारे प्रत्येक बँक खाते आधार क्रमांकाशी लिंक करण्यात आले आहे. त्यामुळे गत वर्षीपासून आषाढी वारी सोहळ्यात सहभागी होणार्‍या दिंड्यांना मिळणार्‍या गॅस सिलिंडरचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामध्ये अनेक दिंडी मालकांना आपल्या वैयक्तिक गॅस सिलिंडरमधून दिंडीसाठी गॅस खरेदी केल्याने एकाच वेळी सहा ते सात गॅस सिलिंडर पंधरा दिवसांत संपतात. त्यात शासनाचे वर्षाला बाराच अनुदानित गॅस सिलिंडर देण्याचे बंधन घातले आहे. यामुळे यंदा सर्वच बैठकांमध्ये वारकर्‍यांनी व दिंड्या मालकांनी सवलतीच्या दरात गॅस सिलिंडर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली. सोमवारी पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतदेखील या विषयावर चर्चा झाली होती.
याबाबत पुरवठा उपायुक्त प्रकाश कदम यांनी मंगळवारी तातडीने सर्व गॅस कंपनीचे अधिकारी व संबंधित अधिकार्‍यांची बैठक घेतली. यावेळी शहर अन्न धान्य वितरण अधिकारी निलीमा धायगुडे, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत पिसाळ, ज्ञानेश्वर महाराज पालीख सोहळा दिंडी समाजचे अध्यक्ष मारुती कोकाटे उपस्थित होते.

Web Title: Warcars gas cylinders at discounted rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.