वॉर्डबॉयने ३ दिवसाच्या बालकाचा पाय मोडला
By Admin | Published: February 7, 2017 10:33 AM2017-02-07T10:33:10+5:302017-02-07T14:10:17+5:30
रडत होता म्हणून रुग्णालयातील कर्मचा-याने तीन वर्षांच्या बालकाचा पाय मोडल्याची धक्कादायक घटना उत्तराखंडमध्ये घडली.
ऑनलाइन लोकमत
नैनिताल, दि. ७ - लहानग्यांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नुकतेच जन्माला आलेले नवजात अर्भक सतत रडते म्हणून वॉर्डबॉयने त्या अर्भकाचा पाय तोडल्याची धक्कादायक घटना उत्तराखंडमधील रुकडी येथील एका खासगी रुग्णालयात समोर आली आहे. हा मुलगा तीन दिवसांचा असून सीसीटीव्हीमध्ये ही घटना कैद झाली आहे.
पीडित बालकाला रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आले होते व त्याच खोलीत आरोपीही निगराणीसाठी बसला होता. ते लहान मूल रडू लागले असता आरोपीने त्याच्या जवळ जाऊन निर्दयीपणे त्याचा पाय खेचला. आणि काहीच घडले नाही अशा थाटात तो पुन्हा आपल्या जागेवर जाऊन बसला. त्या मुलाचे रडणे ऐकूनही त्याला काहीच फरक पडला नाही.
या घटनेच्या काही काळानंतर पीडित बालकाला डेहराडूनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा पाय फ्रॅक्चर झाल्याचे निदर्शनास आले आणि घडला प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.