मनपाला परवानगीशिवाय रस्त्यावर पोल उभारणी कारवाईचा इशारा : स्थायी सभापतींचे महावितरणला पत्र

By admin | Published: November 10, 2015 08:20 PM2015-11-10T20:20:00+5:302015-11-10T20:20:00+5:30

जळगाव : मनपाला न विचारताच महावितरणतर्फे शहरातील वाढीव हद्दीत रस्त्यावर पोल उभारणी केली जात असल्याने ते पोल वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. त्यामुळे मनपाने यास आक्षेप घेतला असून स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन यापुढे मनपाची पूर्व परवानगी न घेतल्यास संबंधित मक्तेदारावर कायदेशिर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

Warning of action taken on road without permission from Municipal Corporation: letter to the standing chairmen of Mahavitaran | मनपाला परवानगीशिवाय रस्त्यावर पोल उभारणी कारवाईचा इशारा : स्थायी सभापतींचे महावितरणला पत्र

मनपाला परवानगीशिवाय रस्त्यावर पोल उभारणी कारवाईचा इशारा : स्थायी सभापतींचे महावितरणला पत्र

Next
गाव : मनपाला न विचारताच महावितरणतर्फे शहरातील वाढीव हद्दीत रस्त्यावर पोल उभारणी केली जात असल्याने ते पोल वाहतुकीस अडथळा ठरत आहेत. त्यामुळे मनपाने यास आक्षेप घेतला असून स्थायी समिती सभापती नितीन बरडे यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंता यांना पत्र देऊन यापुढे मनपाची पूर्व परवानगी न घेतल्यास संबंधित मक्तेदारावर कायदेशिर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
महावितरणतर्फे खाजगी मक्तेदारामार्फत नवीन वीज वाहिनी उभारणीची (पोल टाकण्याचे)काम केले जात आहे. ही कामे करताना मनपा अधिकार्‍यांशी संपर्क करून ज्या ठिकाणी अथवा रस्त्यावर पोलची उभारणी करायची आहे, त्या रस्त्याची लांबी, रूंदी अवगत करून घेऊन पोल उभारण्याच्या जागा निि›त केल्यानंतरच पोलची उभारणी केली पाहिजे. मात्र तसे न होता परस्पर वीज पोल उभारणी केली जात आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेपासून ५-७ फूट आत पोलची उभारणी केली गेली आहे. या पोलचा वाहतुकीला अडथळा होतो. नंतर मात्र हे पोल शिफ्ट करण्यासाठी महावितरणकडूनच मनपाकडे खर्चाची मागणी केली जाईल. त्यामुळे यापुढे विद्युत पोलची उभारणी करण्यापूर्वी महाराष्ट्र प्रांतिक मनपा अधिनियम १९४९ मधील तरतुदीनुसार तसेच वीज अधिनियमातील तरतुदीनुसार मनपाची म्हणजेच जागा मालकाची पूर्व परवानगी घेणे आवश्यक आहे. तसे न झाल्यास संबंधित मक्तेदारावर कारवाई करावी लागेल, पोलिसांत गुन्हाही दाखल करावा लागेल, असा इशारा दिला आहे.

Web Title: Warning of action taken on road without permission from Municipal Corporation: letter to the standing chairmen of Mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.