Corona Third Wave: सप्टेंबरमध्येच तिसऱ्या लाटेचा इशारा; रोज ४ ते ५ लाख रुग्ण?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2021 06:09 AM2021-08-23T06:09:02+5:302021-08-23T06:09:21+5:30
नीती आयोगाने केले सावध, कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत धोरण आखण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या गटाने गेल्याच महिन्यात नीती आयोगाकडे आपला अहवाल सादर केला. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याची शिफारस करण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोरोनाची दुसरी लाट संपल्यात जमा असताना अजूनही कोरोनाचा धोका टळला नसल्याचा इशारा नीती आयोगाने दिला आहे. पुढील महिन्यात देशभरात किमान दोन लाख आयसीयू बेड्स तयार ठेवा, असे निर्देश नीती आयोगाने दिले आहेत. तिसऱ्या लाटेत कोरोनाबाधितांची संख्या दरदिवशी ४ ते ५ लाख असू शकते, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत धोरण आखण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या गटाने गेल्याच महिन्यात नीती आयोगाकडे आपला अहवाल सादर केला. त्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेसाठी सज्ज राहण्याची शिफारस करण्यात आली आहे. नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांच्या अध्यक्षतेखालील सक्षम गटाने हा अहवाल तयार केला असून त्यात पुढील महिन्यात देशभरात दोन लाख आयसीयू बेड्स तयार ठेवण्यात यावेत, असे सूचित करण्यात आले आहे. तिसऱ्या लाटेदरम्यान १०० कोरोनाबाधितांपैकी २३ बाधितांना रुग्णालयात दाखल करावे लागेल, असा अंदाज या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे.
काय आहेत शिफारशी...
nकोरोनाच्या तिसऱ्या लाटेत दरदिवशी ४ ते ५ लाख कोरोनाबाधित देशभरात आढळून
येतील.
nपुढील महिन्यात किमान दोन
लाख आयसीयू बेड्स तयार
हवेत.
n१ लाख २० हजार आयसीयू बेड्स व्हेंटिलेटर्ससह तयार ठेवावेत.
nसात लाख नॉन-आयसीयू हॉस्पिटल बेड्स तयार असावेत.
nत्यातील पाच लाख बेड्सना प्राणवायूची जोड दिलेली असावी.
n१० लाख कोविड आयसोलेशन केअर बेड्स तयार ठेवावेत.