पाच राज्यांत मुसळधार पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 10:27 PM2020-07-18T22:27:49+5:302020-07-18T22:28:31+5:30
आसामच्या २७ जिल्ह्यांत अनेक भागांत पूरस्थिती आहे. आतापर्यंत ७१ जणांचा मृत्यू झाला आहे.
नवी दिल्ली : हवामान विभागाने पूर्वाेत्तरमधील काही राज्यांत जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. आसाम, मेघालय, सिक्कीम आणि पश्चिम बंगाल, अरुणाचल प्रदेशात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
आसाममध्ये आधीच पुराने कहर केलेला असताना या पावसाने आसाममध्ये पुन्हा मोठा पूर येऊ शकतो, तर मेघालय, अरुणाचल प्रदेश, सिक्कीम आणि पश्चिम बंगालच्या उत्तर भागात नव्याने पूर येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पश्चिम बंगाल आणि सिक्कीमच्या काही भागांत यामुळे भूस्खलन होऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.
आसामच्या २७ जिल्ह्यांत अनेक भागांत पूरस्थिती आहे. आतापर्यंत ७१ जणांचा मृत्यू झाला आहे. ३ हजारांहून अधिक गावातील साडेतीन लाख लोकांना याचा फटका बसला आहे. रस्ते, विजेचे खांब आदींचे मोठे नुकसान झाले आहे.