"साबण,शॅम्पूने आंघोळ करा मगच योगींसमोर या"
By admin | Published: May 27, 2017 04:10 PM2017-05-27T16:10:55+5:302017-05-27T16:10:55+5:30
. साबण, शॅम्पूने व्यवस्थित आंघोळ करा आणि नंतरच योगी अदित्यनाथ यांच्या समोर या. असं अधिकाऱ्यांनी फर्मान काढलं आहे
Next
ऑनलाइन लोकमत
कुशीनगर, दि. 27- उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी अदित्यनाथ यांच्या कुशीनगर भेटीच्या पार्श्वभूमीवर तिथल्या अधिकाऱ्यांनी एक अजब फर्मान काढलं आहे. साबण, शॅम्पूने व्यवस्थित आंघोळ करा आणि नंतरच योगी अदित्यनाथ यांच्या समोर या. असं अधिकाऱ्यांनी फर्मान काढलं आहे. यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तेथील वस्तितील लोकांना साबण, शॅम्पू आणि सेंटचं वाटप केलं आहे. दरम्यान जिल्हा प्रशासनानं अशी कोणतीही घटना घडली नसल्याचं म्हटलं आहे.
योगी आदित्यनाथ यांनी कुशीनगरमधल्या कसीया भागात एन्सेफलायटीस व्हॅक्सिनेशन नावाची नवी मोहीम सुरू केली आहे. 25 मे चे 11 जून पर्यत ही मोहीत सुरू असणार आहे. 38 जिल्ह्यातील 88 लाख मुलांना या मोहीमेचा फायदा होणार आहे. एन्सेफलायटीस व्हॅक्सिनेशनसाठी आयोजीत केलेल्या कार्यक्रमात मुसाहर समुदायाच्या सदस्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ यांच्या समोर जाण्यासाठी तेथील लोकांना साबण, शॅम्पूचं वाटप करण्याच आलं आणि आंघोळ करूनच जाण्याचा फतवा काढण्यात आला आहे.
तसंच मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ कुशीनगरच्या मैनपूरमधील दीनापट्टी या गावाला भेट देणार होते. त्याआधी येथील लोकांना साबण, शॅम्पू वाटप करण्यात आलं. गेल्या अनेक वर्षापासून या गावात विकास झालेला नाही. पण मुख्यमंत्री या गावात भेट देणार असल्याचं कळताच अधिकाऱ्यांनी या गावाकडे लक्ष देणं सुरु केलं. असं बोललं जातं आहे. तात्काळ तिकडचे रस्ते तयार करण्यात आले. इतकंच नाही तर शौचालयही बांधण्यात आले. एकीकडे या गावातील लोकांकडे अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडेही नाहीत. पण अधिकाऱ्यांनी त्यांना योगींसमोर नीट येण्यासाठी तंबी देत थेट त्यांच्या हातात साबण, शॅम्पू दिल्याची माहिती समोर येते आहे.