टॉयलेटमध्ये कप धुतले अन् त्यातच मंत्री-जिल्हाधिकाऱ्यांना चहा दिला; व्हिडिओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2024 20:06 IST2024-12-13T20:05:18+5:302024-12-13T20:06:40+5:30
हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

टॉयलेटमध्ये कप धुतले अन् त्यातच मंत्री-जिल्हाधिकाऱ्यांना चहा दिला; व्हिडिओ व्हायरल
Rajasthan News : राजस्थानमध्ये मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाले आहे. यानिमित्त राज्यभरात अनेक ठिकाणी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यातील एक कार्यक्रम पाली जिल्ह्यातील महाविद्यालयातही आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयीन कार्यक्रमात प्रभारी मंत्री, जिल्हाधिकारी, आयजी यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या कार्यक्रमाचा एक व्हिडिओही व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कॉलेजच्या टॉयलेटमध्ये चहाचे कप धुतले जात असल्याचे दिसत आहे.
शुक्र कप धोकर तो दिए है
— अल्हड़ पत्रकार (@Rajesh__Jamaal) December 13, 2024
#Pali#Rajasthanpic.twitter.com/mpun4SCdJ6
पाली जिल्ह्यातील बांगर महाविद्यालयात जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जिल्हा प्रभारी मंत्री झाबरसिंग खर्रा, जिल्हाधिकारी एलएन मंत्री, आयजी प्रदीप मोहन शर्मा, एसपी चुनाराम जाट यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी सहभागी झाले होते. भजनलाल सरकारचे काम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये टॉयलेटमध्ये चहाचे कप धुतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे. हा व्हिडीओ समोर आल्यानंतर कोणत्याही जबाबदार व्यक्तीची प्रतक्रिया आलेली नाही. व्हायरल झालेल्या व्हिडिओबाबत मीडियाने अधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, सर्वांनी काहीही बोलण्यास नकार दिला.