WATCH: विजयाच्या खुशीत सपा कार्यकर्त्याचा अजब-गजब डान्स
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2018 16:30 IST2018-05-31T16:22:02+5:302018-05-31T16:30:13+5:30
उत्तरप्रदेशातील नूरपुर विधानसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीचा विजय झाल्यामुळे पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.

WATCH: विजयाच्या खुशीत सपा कार्यकर्त्याचा अजब-गजब डान्स
नवी दिल्ली : देशातील 10 राज्यांमधील एकूण 4 लोकसभा आणि 10 विधानसभा मतदारसंघांमधील पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचाचे लक्ष लागले होते. दरम्यान, उत्तरप्रदेशातील नूरपुर विधानसभा मतदारसंघात समाजवादी पार्टीचा विजय झाल्यामुळे पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी समाजवादी पार्टीच्या एका कार्यकर्त्यांने केलेल्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
WATCH: Celebrations outside Samajwadi Party office in Lucknow after the party won Noorpur Assembly seat pic.twitter.com/QXYQreVWWz
— ANI UP (@ANINewsUP) May 31, 2018
या निवडणुकीत समाजवादी पार्टीचे उमेदवार नैमुल हसम यांचा सहा हजार मतांनी विजय झाला. त्यांनी भाजपाचा उमेदावर अवनी सिंह यांचा पराभव केला. भाजपा आणि समाजवादी पार्टी यांच्यातील ही लढत अटीतटीची झाल्याचे दिसून आले. याशिवाय, उत्तर प्रदेशमधील कैराना लोकसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकदल, सपा, बसपा आणि काँग्रेस अशा विरोधी पक्षांच्या एकजुटीने भाजपाला भुईसपाट केले. राष्ट्रीय लोक दलाच्या उमेदवार तबस्सूम यांनी सर्व भाजपाविरोधकांच्या पाठिंब्याच्या जोरावर या पोटनिवडणुकीत बाजी मारली.