VIDEO: सरकारी अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याने मनेका गांधी अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2018 14:45 IST2018-02-17T14:45:24+5:302018-02-17T14:45:31+5:30
मनेका गांधी या अधिकाऱ्यावर प्रचंड संतापल्या.

VIDEO: सरकारी अधिकाऱ्याला अपशब्द वापरल्याने मनेका गांधी अडचणीत
लखनऊ: भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याला फैलावर घेताना केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री मनेका गांधी यांची जीभ घसरल्यामुळे त्या अडचणीत आल्या आहेत. मनेका गांधी या अधिकाऱ्याच्या वजनावरून आक्षेपार्ह टिप्पणी करतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
उत्तर प्रदेश येथील बहेरी येथील सार्वजनिक सभेदरम्यान हा प्रकार घडला. यावेळी काही लोकांना संबंधित सरकारी अधिकाऱ्याविरोधात मनेका गांधी यांच्याकडे भ्रष्टाचाराची तक्रार केली. त्यावेळी मनेका गांधी या अधिकाऱ्यावर प्रचंड संतापल्या. मनेका यांनी सगळ्यांदेखत या अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली. मात्र, यादरम्यान लोकांचे पैसे खाऊन तू ह#*%# सारखा फुगत चाललायस, असे आक्षेपार्ह विधान मेनका गांधी यांनी केले. यावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
#WATCH Union Minister Maneka Gandhi rebukes and abuses an official who was being accused of corruption by people at a public meeting in UP's Baheri pic.twitter.com/o6ruXXmCJs
— ANI (@ANI) February 17, 2018