VIDEO : दंडवत घालून नमस्कार करणाऱ्या बालकाला PM मोदींचा आशीर्वाद, हैदराबादच्या निरागस मुलानं मन जिंकलं
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2022 07:41 AM2022-02-06T07:41:11+5:302022-02-06T07:42:36+5:30
शमशाबाद येथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते 11व्या शतकातील संत श्री रामानुजाचार्य यांच्या 216 फूट उंच पुतळ्याचे 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी'चे अनावरण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान एका मुलाने पंतप्रधान मोदींना साष्टांग दंडवत घालून त्यांचा आशीर्वाद घेतला.
हैदराबाद - पंतप्रधाननरेंद्र मोदी यांचा हैदराबाद दौरा अविस्मरणीय ठरला. शमशाबाद येथे पंतप्रधान मोदींच्या हस्ते 11व्या शतकातील संत श्री रामानुजाचार्य यांच्या 216 फूट उंच पुतळ्याचे 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी'चे (Statue of Equality) अनावरण करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान एका मुलाने पंतप्रधान मोदींना साष्टांग दंडवत घालून त्यांचा आशीर्वाद घेतला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
पंतप्रधान मोदींना दंडवत घालून नमस्कार -
हैदराबादमध्ये 11व्या शतकातील भक्तीमार्गाचे संत श्री रामानुजाचार्य यांच्या स्मृतीप्रित्यर्थ 'स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी'चा उद्घाटन समारंभात पार पडला. यावेळी एक मूलाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना 'दंडवत' घालून नमस्कार केला. यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याला उठवून आशीर्वाद दिला. दंडवत प्रणामचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
हैदराबाद में 11वीं सदी के भक्ति संत श्री रामानुजाचार्य की याद में 'स्टैच्यू ऑफ इक्वलिटी' के उद्घाटन समारोह के दौरान एक बच्चे ने पीएम मोदी के सामने 'दंडवत प्रणाम' किया। इसके बाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने उसको उठाकर आशीर्वाद दिया। pic.twitter.com/zcEP6gqA0v
— NBT Hindi News (@NavbharatTimes) February 5, 2022
दंडवत प्रणाम केल्याचा व्हिडिओ व्हायरल -
पंतप्रधान मोदींनी यांनी पुतळ्याचे अनावरण केल्यानंतर परिसराची पाहणी केली. याच वेळी एक मूलगा त्यांच्याजवळ आला आणि त्याने दंडवत घालून नरेंद्र मोदींना नमस्कार केला. यावर पीएम मोदींनीही त्यांच्या पाठीवर थाप मारून त्याला आशीर्वाद दिला. चार सेकंदांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओ बघणारे लोक या मुलाच्या संस्काराचे कौतुक करत आहेत.