मोबाइलवर मॅच पाहण्यात गुंग अन् सिग्नल तोडला; मंत्र्यांनी सांगितले रेल्वे अपघाताचे कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2024 07:44 AM2024-03-04T07:44:50+5:302024-03-04T07:45:19+5:30

२९ ऑक्टोबरला विशाखापट्टणम-रायगड पॅसेंजर रेल्वेने एक नव्हे, तर दोन सिग्नल तोडत पुढे असलेल्या विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर रेल्वेला धडक दिली.

Watching the match on a mobile phone caused the train accident says minister said | मोबाइलवर मॅच पाहण्यात गुंग अन् सिग्नल तोडला; मंत्र्यांनी सांगितले रेल्वे अपघाताचे कारण

मोबाइलवर मॅच पाहण्यात गुंग अन् सिग्नल तोडला; मंत्र्यांनी सांगितले रेल्वे अपघाताचे कारण

नवी दिल्ली : मागील वर्षी आंध्र प्रदेशच्या विजयनगर जिल्ह्यात झालेला रेल्वेअपघात हा दोन्ही लोको पायलट मोबाइलवर क्रिकेट मॅच पाहत असल्याने झाल्याचा धक्कादायक खुलासा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला. या अपघातात दोघांचाही मृत्यू झाला.

२९ ऑक्टोबरला विशाखापट्टणम-रायगड पॅसेंजर रेल्वेने एक नव्हे, तर दोन सिग्नल तोडत पुढे असलेल्या विशाखापट्टणम-पलासा पॅसेंजर रेल्वेला धडक दिली. या अपघातात त्यात १४ जणांचा मृत्यू झाला. चौकशीत लोको पायलट हे मोबाईलवर मॅच पाहण्यात गुंग होते आणि त्यांनी सिग्नल त्यांनी तोडल्याचे वैष्णव यांनी सांगितले.

केवळ ६५ इंजिनमध्ये ‘कवच’ 
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी मे २०२२ मध्ये अपघात टाळण्यासाठी रेल्वेइंजिनमध्ये ‘कवच’ प्रणाली बसविण्याची घोषणा केली होती. त्यानंतर वर्षभरात देशातील १३,२१५ पैकी ६५ इंजिनमध्ये ही प्रणाली बसविण्यात आली.
 

Read in English

Web Title: Watching the match on a mobile phone caused the train accident says minister said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.