"दोन मिनिटांत" बदललं एका वॉचमनचं आयुष्य

By admin | Published: May 2, 2017 06:12 PM2017-05-02T18:12:02+5:302017-05-02T18:12:19+5:30

काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत होता. या व्हिडीओमुळे एका वॉचमनचं आयुष्य बदललं.

A Watchman's Life Changed "In Two Minutes" | "दोन मिनिटांत" बदललं एका वॉचमनचं आयुष्य

"दोन मिनिटांत" बदललं एका वॉचमनचं आयुष्य

Next
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 2 - काही दिवसांपासून सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत होता. या व्हिडीओमुळे अहमदाबादच्या एका वॉचमनचं आयुष्य बदललं. पावणे दोन मिनिटांच्या या व्हिडीओत वॉचमन रतन गाधवी गुजराती भाषेत एक लोकगीत गात आहे. त्यांच्या मधुर आवाजामुळे ज्यांनी कोणी हा व्हिडीओ पाहिला ते तो व्हिडीओ शेअर करण्यापासून स्वतःला रोखू शकले नाहीत. 
 
रतन यांना लहानपणापासूनच गायनाची आवड होती पण योग्य पाठबळ नसल्यामुळे त्यांना आपल्यातील प्रतीभा दाखवता आली नाही. नोकरीसाठी आपल्या गावाहून ते अहमदाबादला आले. दरम्यान आपल्यातील प्रतिभा दाखवण्यासाठी ते योग्य संधीही शोधत होते. कामावर असतानाही त्यांनी गायन सोडलं नव्हतं. जो कोणी त्यांचा आवाज ऐकायचा तो त्यांचा फॅन व्हायचा. हळूहळू त्यांच्या चाहत्यांची संख्या वाढायला लागली. एक दिवस रतन यांच्या एका मित्राने त्यांचं गाणं रेकॉर्ड करून सोशल मीडियावर अपलोड केलं.  मग काय, बघता बघता व्हिडीओ व्हायरल झाला आणि रतन प्रकाशझोतात आले. 
 
तेव्हापासून रतन यांनी अनेक स्थानिक चॅनलमध्ये इंटरव्यू दिला आहे. इंटरव्यूमध्येही ते आपल्या सिक्युरीटी गार्डच्या गणवेशातच असतात. एका इंटरव्यूमध्ये आपल्याला  सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये भाग घेण्याची इच्छा होती पण योग्य पाठबळ नसल्यामुळे ते शक्य होऊ शकलं नाही असं रतनने सांगितलं. पण आता रतनच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. कारण त्यांच्या गायनाचं शिक्षण सुरू झालं आहे. प्रसिद्ध म्युझीक कंपोजर सचिन-जिगर यांनी रतनसोबत काम करण्याची इच्छा बोलून दाखवली आहे. तर एका प्रोड्यूसरने पुढच्या सिनेमासाठी रतनकडून एक गाणं रेकॉर्ड करून घेणार असल्याचं म्हटलं आहे. या बदललेल्या आयुष्यासाठी ज्या मित्राने व्हिडीओ अपलोड केला होता त्याचा नेहमीत आभारी राहील असं रतन म्हणाले.      
 
पाहा व्हिडीओ:
 

Web Title: A Watchman's Life Changed "In Two Minutes"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.