वॉटर एटीएम
By admin | Published: July 23, 2016 12:02 AM2016-07-23T00:02:22+5:302016-07-23T00:02:22+5:30
शहरात शुद्ध पाणी मिळावे म्हणून एक रूपयात एक लिटर व ५ रूपयात २० लिटर शुद्ध पाणी अशी वॉटर एटीएम कल्पना रोटरी परिवारातर्फे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जागेची आवश्यकता आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी महापालिका किंवा अन्य संस्था वा व्यक्तीने जास्तीत जास्त २०० फुट जागा दिल्यास हा प्रकल्प लवकरात लवकर उभा राहू शकेल असे महेंद्र रायसोनी यांनी सांगितले.
Next
श रात शुद्ध पाणी मिळावे म्हणून एक रूपयात एक लिटर व ५ रूपयात २० लिटर शुद्ध पाणी अशी वॉटर एटीएम कल्पना रोटरी परिवारातर्फे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जागेची आवश्यकता आहे. शहरातील मध्यवर्ती ठिकाणी महापालिका किंवा अन्य संस्था वा व्यक्तीने जास्तीत जास्त २०० फुट जागा दिल्यास हा प्रकल्प लवकरात लवकर उभा राहू शकेल असे महेंद्र रायसोनी यांनी सांगितले. ------रोटरी क्लब इस्टचे संजय शाह म्हणाले, शालेय विद्यार्थी घडावा यासाठी सात बाय सात असा प्रकल्प राबविला जात आहे. एका शाळेत सात महिने हा प्रकल्प असेल. यासाठी तज्ज्ञांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रबोधन करण्यात येत असते. यासह शाळांमध्ये हात धुणे, तीरळेपणावर उपायांचे शिबिर, दत्तक घेतलेल्या मनपा ३२ नंबर शाळेत सर्व शैक्षणिक मदत केली जाते. ------सदस्यांच्या कर्मचार्यांना आरोग्य मदतरोटरी परिवारातील १३४ मेंबर्सकडे जळपास ९ हजार कर्मचारी आहेत. त्या प्रत्येकास एक आरोग्य पत्रिका देण्यात आली आहे. डॉक्टरांकडे त्यांना सवलतीच्या दरात आरोग्य सेवा पुरविण्याचा हा उपक्रम असल्याचे वर्धमान भंडारी यांनी सांगितले.-----मुंबईतील धारावी येथे कार्य करत असलेले डॉ. जोकीन यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छतागृहे उभारण्याची संकल्पना आहे. तांबापूरा, समता नगरात शौचालये उभारण्यात येणार आहेत, असे संजय शहा म्हणाले.---- ९ हॅपी शाळारोटरी जळगाव सेंट्रलचे आशिष महाजन म्हणाले, क्लबमार्फत ९ शाळांमध्ये हॅपी शाळा प्रोजेक्ट राबविला जात आहे. या शिवाय जलयुक्त अभियान, कानळदा, चिंचोली शाळेत शौचालये उभारली, नेत्र व हृदय तपासणी शिबिर असे उपक्रम राबविण्यात आले आहेत. ----वृद्धाश्रमात वॉशिंग मशिनरोटरी गोल्ड सिटीचे योगेश मुंदडा म्हणाले, दत्तक घेतलेल्या डिकसाई, ३८ नंबर लाठी शाळेत जनप्रबोधन, शालेय साहित्य वाटप केले जाते.