नगरमध्ये पाणी पेटले! रास्ता रोको : गडाख यांना अटक; न्यायालयीन कोठडी
By Admin | Published: August 26, 2015 11:32 PM2015-08-26T23:32:51+5:302015-08-26T23:32:51+5:30
>नेवासा (जि.अहमदनगर) : मुळा धरणातून शेतीसाठी आवर्तन सोडण्याच्या मागणीसाठी सुरु झालेले तालुक्यातील शेतकर्यांचे आंदोलन बुधवारी पेटले. रास्ता रोको केल्याप्रकरणी माजी आमदार शंकरराव गडाख यांच्यासह सहा आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी अटक केली़सर्वांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली. आंदोलन चिघळण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात आहे. मुळा धरणाचे आवर्तन सोडावे, यासाठी बुधवारी घोडेगाव चौफुला येथे गडाख यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकर्यांनी रास्ता रोको केला. तीन तासांच्या आंदोलनामुळे औरंगाबाद-पुणे महामार्ग ठप्प झाला होता. मुळा धरणाचे आवर्तन सुटल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याची भूमिका गडाख व त्यांच्या समर्थकांनी घेतल्याने पोलीस प्रशासनाची तारांबळ उडाली. शेवटी पोलिसांनी गडाख यांच्यासह सहा कार्यकर्त्यांना अटक केली़ (प्रतिनिधी)----------------आज नेवासा बंदआंदोलकांच्या अटकेच्या निषेधार्थ गुरुवारी नेवासा तालुका बंद ठेवण्यात येणार असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष कारभारी जावळे यांनी सांगितले.