अतांत्रिक लोकांचा जलसंधारणाच्या कामात धूमाकूळ जलसंपत्ती दिन विशेष : जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांची सरकारवर टिका

By admin | Published: April 24, 2016 12:39 AM2016-04-24T00:39:00+5:302016-04-24T00:39:00+5:30

जळगाव : जलसंधारणाच्या कामांमध्ये अतांत्रिक लोक शिरले आहेत. शासनाच्या जलयुक्त शिवार कामांची जबाबदारी कृषि विभागावर आहे. ही जबाबदारी भूजलशास्त्रज्ञ व स्थापत्य अभियांत्रिकी यांच्याकडे हवी. पण अतांत्रिक लोक या कामांमध्ये आहेत. या लोकांनी अक्षरक्ष: जलसंधारणाच्या कामांमध्ये धुमाकूळ घातला आहे. मग कितीही जलयुक्त शिवारची कामे झाली तरी टँकरमुक्त खान्देश करणे शक्य नाही, अशी टिका जलतज्ज्ञ तथा शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी लोकमतशी बोलताना केली आहे.

Water conservation works for the people of Antarctic people. Water Special: Specialist on the government of Suresh khanapurkar | अतांत्रिक लोकांचा जलसंधारणाच्या कामात धूमाकूळ जलसंपत्ती दिन विशेष : जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांची सरकारवर टिका

अतांत्रिक लोकांचा जलसंधारणाच्या कामात धूमाकूळ जलसंपत्ती दिन विशेष : जलतज्ज्ञ सुरेश खानापूरकर यांची सरकारवर टिका

Next
गाव : जलसंधारणाच्या कामांमध्ये अतांत्रिक लोक शिरले आहेत. शासनाच्या जलयुक्त शिवार कामांची जबाबदारी कृषि विभागावर आहे. ही जबाबदारी भूजलशास्त्रज्ञ व स्थापत्य अभियांत्रिकी यांच्याकडे हवी. पण अतांत्रिक लोक या कामांमध्ये आहेत. या लोकांनी अक्षरक्ष: जलसंधारणाच्या कामांमध्ये धुमाकूळ घातला आहे. मग कितीही जलयुक्त शिवारची कामे झाली तरी टँकरमुक्त खान्देश करणे शक्य नाही, अशी टिका जलतज्ज्ञ तथा शिरपूर पॅटर्नचे जनक सुरेश खानापूरकर यांनी लोकमतशी बोलताना केली आहे.
जलसंपत्ती दिनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्याशी संवाद साधला. खानापूरकर हे मूळचे रावेर तालुक्यातील आहे. त्यांनी खान्देशसाठी शिरपूर पॅटर्न राबविण्याची मागणी पुन्हा एकदा यासंवादाच्या निमित्ताने केली.
पाणी प्रश्न कायम
पाणी प्रश्न मागील ६० वर्षे कायम आहे. शेतकर्‍यांना फक्त आश्वासने दिली जातात. शेतीला सोडा पण आता तर प्यायला पुरेसे पाणी नाही. अलीकडे या सरकारने जलयुक्त शिवार अभियान हाती घेतले, पण जेथे मागील काळात ही कामे झाली त्या गावांमध्येही टंचाई आहे. खान्देशात तशी स्थिती दिसून येते. दोन फूट खड्डा करा आणि आजूबाजूला माती टाका... फोटो काढा आणि बिले काढून घ्या..., असा प्रकार सुरू आहे. कृषि विभाग अतांत्रिक पद्धतीने हे काम करीत आहे. या अशाच अतांत्रिक लोकांनी मागील ४० वर्षे राज्यात जलसंधारणाची कामे केली म्हणून पाणीप्रश्न अधिक भीषण बनला असेही खानापूरकर म्हणाले.
जलसंधारण तांत्रिक पद्धतीने व्हावे
जलसंधारण हे तांत्रिक पद्धतीने भूजल शास्त्रज्ञ व स्थापत्य अभियंता यांच्यामाध्यमातून व्हावे. शिरपूर पॅटर्न अशाच पद्धतीने झाला. शिरपूर तालुका ८० टक्के बागायती आहे. एकही शेतकरी आत्महत्या नाही..., हे कामाचे फलित आहे. खान्देशात किंवा राज्यात अन्यत्र आठ हजार मी.मी.पाऊस पडला आणि अतांत्रिक पद्धतीने जलसंधारणाचे काम सुरू राहीले तर टँकरमुक्ती होऊ शकणार नाही, असेही खानापूरकर यांनी सांगितले.

पाणी पातळी खालावली
जिल्‘ात गिरणा काठावर शेती उजाड झाली आहे. चाळीसगाव, भडगाव, पाचोरा, जळगाव आदी तालुक्यांमधील गिरणाकाठच्या गावांमध्ये ८० फुटांवर पाणी मिळायचे. पण आता २०० फूट कूपनलिका करूनही पाणी मिळत नाही. २०० फूट कूपनलिका करायला ४५ हजार रुपये खर्च येतो. पाणी पुरेसे नसले तर हा खर्च वाया जातो. गिराणा नदीवर किंवा गिरणाकाठच्या भागात जलसंधारणाची कामे न झाल्याने केळी, लिंबूची शेती उजाड झाली.

Web Title: Water conservation works for the people of Antarctic people. Water Special: Specialist on the government of Suresh khanapurkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.