जल संकट चौथ्या दिवशीही व्हॉल्व्हने आणले नाकेनऊ: आजही पाणी पुरवठा अनिित
By admin | Published: March 11, 2016 12:28 AM2016-03-11T00:28:08+5:302016-03-11T00:28:08+5:30
जळगाव : मेहरूणमधील गळती दुरूस्तीचे काम आटोपत नाही तोच वाघूरच्या मुख्य जलवाहिनीवरील
Next
ज गाव : मेहरूणमधील गळती दुरूस्तीचे काम आटोपत नाही तोच वाघूरच्या मुख्य जलवाहिनीवरील रोडवरील हॉटेल कस्तुरीनजीक असलेला मुख्य वाहिनीवरील हॉल्व्ह उघडण्यासाठी कर्मचारी गेले असता तो जाम झाल्याचे लक्षात आले. बरेच प्रयत्न करूनही तो उघडणे शक्य झाले नाही. पहाटे तीन वाजेपर्यंत त्यासाठी प्रयत्न झाले मात्र तरीही व्हॉल्व्ह उघडणे शक्य झाले नाही. त्यामुळे शहरात सलग चौथ्या दिवशीही पाणी पुरवठा होऊ शकला नाही. -----इन्फोजनता बेहालऐन उन्हाळ्यात उद्भवलेल्या या परिस्थितीमुळे शहरातील पाणी पुरवठा यंत्रणा पूर्णत: कोलमडली आहे. नागरिकांचे यामुळे प्रचंड हाल होत असल्याचे चित्र शहरातील उपनगरांमध्ये होते. शहरालगत असलेल्या तांबापूरा, हरिविठ्ठल नगर, समता नगर यासह झोपडपी भागातील नागरिकांना तर याचा अधिकच त्रास होत आहे. -----व्हॉल्व्ह उघडण्यासाठी क्रेनची मदतबरेच प्रयत्न करूनही हा व्हॉल्व्ह उघडला न गेल्याने अखेर त्याच्या आजुबाजुने जेसीबी लावून खड्डा खोदण्यात आला. यानंतर क्रेन आणून सकाळपासून व्हॉल्व्ह उघडण्याचे काम पुन्हा सुरू करण्यात आले. व्हॉल्व्हची झडप उघडत नसल्याने बाहेरून काही तज्ज्ञांना बोलवून हे काम करण्यात येत होते मात्र उशिरापर्यंत त्यात यश न आल्याने रात्री व्हॉल्व्ह पूर्ण काढण्यात आला. तेथे पाईप जोडण्यात येणार असून त्यानंतर पाणी पुरवठा केला जाणार आहे. हे कामही रात्री उशिरापर्यंत चालणार असल्याने शुक्रवारचा पाणी पुरवठाही अनिित असल्याचे पाणी पुरवठा अभियंता डी.एस. खडके यांनी सांगितले.