२०५० मध्ये भारतावर पाणी परदेशातून मागवण्याचं संकट
By Admin | Published: April 22, 2016 12:40 PM2016-04-22T12:40:17+5:302016-04-22T12:40:17+5:30
पाण्याची समस्या कायम राहिल्यास 2050 साली भारताला पिण्याचं पाणी परदेशातून आयात करावं लागू शकत
>ऑनलाइन लोकमत -
मुंबई, दि. २२ - भविष्यात देशातील पाणीसंकट समस्या भीषण होण्याची शक्यता आहे. पाण्याची समस्या कायम राहिल्यास 2050 साली भारताला पिण्याचं पाणी परदेशातून आयात करावं लागू शकत. भुगर्भातील पाणीसाठा वेगाने कमी होत असून 2050 पर्यंत प्रत्येक व्यक्तिमागे 3120 लिटर पाणीसाठा शिल्लक राहील अशी शक्यता केंद्रीय भूजल मंडळाने व्यक्त केली आहे.
आकडेवारीनुसार सध्या देशात प्रत्येक व्यक्तिमागे 5120 लीटर पाणीसाठा शिल्लक आहे. 1951मध्ये हा पाणीसाठा 14180 लिटर होता. इतक्या वर्षात हा पाणीसाठा 35 टक्क्यांनी कमी झाला आहे. 1991 मध्ये पाणीसाठी हा अर्ध्याहून कमी झाला होता. तर 2025 पर्यंत फक्त 25 टक्के पाणीसाठा शिल्लक राहणार आहे. सध्या ज्याप्रकारे पाण्याचा अपव्यय केला जात आहे तो पाहता 2050 पर्यंत फक्त 22 टक्के पाणीसाठा शिल्लक राहण्याचा इशारा केंद्रीय भूजल मंडळाने दिला आहे.
पावसाच्या पाण्याची तलाव, विहिरींमध्ये साठवण न करणे, लोकांमध्ये जागरुकता नसणे अशा अनेक समस्यांमुळे ही परिस्थिती आपण ओढवून घेतल्याचं मत काही तज्ञांनी व्यक्त केलं आहे. वाढती लोकसंख्या आणि त्यांच्या मागण्या पाहता भविष्यात पाणीसंकट गंभीर होईल. भुगर्भात इतकाच पाणीसाठी शिल्लक असेल जितकं पाणी आपण एका दिवसात वापरतो.