थेंब थेंब पाण्यासाठी तडफडणार पाकिस्तान, भारताच्या 'या' निर्णयाचा पाकला बसणार फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2018 04:35 PM2018-06-11T16:35:02+5:302018-06-11T16:35:02+5:30
येत्या काही काळात पाकिस्तानला पाण्याच्या थेंब अन् थेंबासाठी तडफडावं लागणार आहे.
नवी दिल्ली- येत्या काही काळात पाकिस्तानला पाण्याच्या थेंब अन् थेंबासाठी तडफडावं लागणार आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी(आयएमएफ)सह आंतरराष्ट्रीय संस्थांच्या रिसर्च रिपोर्टमधून उघड झालं आहे. रिपोर्टनुसार, 2025पर्यंत पाकिस्तानमध्ये पाण्याशिवाय दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होणार आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या स्थानिक वर्तमानपत्रांतूनही हे भाकित वर्तवण्यात आलं आहे.
पाकिस्तानमधलं ऊर्दू वृत्तपत्र 'जंग'च्या नुसार, जलतज्ज्ञ पाकिस्तानातील वाढती लोकसंख्या आणि भविष्यात होणा-या पाण्याच्या तुटवड्यावर लक्ष वेधत आले आहेत. परंतु सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. आंतरराष्ट्रीय नद्यांमधून मिळणा-या हिश्श्याच्या पाण्याकडे पाकिस्तान लक्ष्य देत नाही आहे. तर पाण्याच्या साठवणुकीसंदर्भात पाकिस्तान बेफिकीर आहे.
1990नंतर पाकिस्ताननं पाण्यासंदर्भात कोणतीही योजना आखलेली नाही. तसेच येत्या काळातील पाण्याच्या संकटाकडेही पाकिस्ताननं गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. तर पाकिस्तानचे स्थानिक वृत्त एक्स्प्रेस लिहितो, जगभरातल्या अनेक भागात पाण्याचा तुटवडा आहे आणि जिकडे पाणी आहे तेसुद्धा प्रदूषित आहे. पाकिस्तानातलं 80 टक्के पाणी प्रदूषित आहे. त्यामुळे येत्या काळात पाण्याची मोठी समस्या उद्भवू शकते. त्यातच भारतानं सिंधू पाणी कराराचं उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
गेल्या काही दिवसांपूर्वी पाकिस्तानातल्या अॅटर्नी जनरल(एजीपी)च्या नेतृत्वातील चार सदस्यांच्या एका प्रतिनिधीमंडळ वॉशिंग्टनला पोहोचले होते. हे प्रतिनिधीमंडळानं किशनगंगा परियोजना आणि दोन्ही देशांमधल्या पाणीकरारावरून जागतिक बँकेशी बैठकही केली होती. तर गेल्या काही दिवसांपूर्वी भारताने सिंधू नदीवर प्रस्तावित केलेल्या किशनगंगा धरण प्रकल्पाला विरोध करणाऱ्या पाकिस्तानला जागतिक बँकेने दणका दिला होता. या प्रकल्पाविरोधात पाकिस्तानने जागतिक बँकेत धाव घेतली होती. मात्र जागतिक बँकेने या प्रकरणी भारताचा प्रस्ताव स्वीकार करण्याचा सल्ला पाकिस्तानला दिला होता.
पाकिस्तानने किशनगंगा प्रकल्पाविरोधात आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र तेथे भारताने याबाबत चौकशी करण्यासाठी एका निष्पक्ष तज्ज्ञाची नियुक्ती करण्याचा प्रस्ताव दिला आहे. त्यातच आता जागतिक बँकेनेही पाकिस्तानने भारताचा प्रस्ताव स्वीकारावा, असा सल्ला दिल्याने पाकिस्तानवर तोंडघशी पडण्याची वेळ आली आहे.