महापालिका बसविणार शाळा व रुग्णालयांत हवेतून पाणी काढणारे मशिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2015 11:22 PM2015-08-11T23:22:11+5:302015-08-11T23:22:11+5:30
Next
>महापालिका बसविणार शाळा व रुग्णालयांत हवेतून पाणी काढणारे मशिनहवेतले पाणी महाग : विरोधी पक्षाकडून विरोधमुंबई :मुंबईतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी महापालिकेने राबविलेल्या योजना अपयशी ठरल्यानंतर महापालिका आता हवेतील आद्रता शोषून पाणी निर्माण करण्याचा प्रयोग करणार आहे. या मशिन पालिका रुग्णालये व शाळांत उपलब्ध करुन दिली जाणार आहेत. हा पाणी प्रकल्प महापालिकेला प्रचंड महागडा ठरणार असल्याने विरोधी पक्षनेत्यांनी याला विरोध केला आहे.आगामी निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी विविध कल्पना समोर आणत आहे. मुंबईतील पाणी टंचाई दूर होत नसल्याने पालिकेने मशीनमार्फत पाण्याचा प्रयोग करण्याचे ठरविले आहे. स्काय वॉटर व एअर वॉटर या दोन कंपन्यांनी गटनेत्यांच्या बैठकीत या प्रकल्पाचे नुकतेच सादरीकरण केले. त्यानुसार एक लिटर पाणी निर्माण होण्यासाठी १ रुपया २५ पैसे ते दीड रुपये असा पाण्याचा दर असणार आहे. हा संपूर्ण खर्च पालिका उचलणार आहे. मुंबईला पुरविण्यात येणार्या पाण्यासाठी सध्या एक हजार लिटरसाठी ४ रुपये २५ पैसे खर्च येतो. त्यापेक्षा हवेतील पाण्याचा खर्च जास्त असताना तो पालिकेला परवडणार कसा हा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे या प्रकल्पाला विरोधकांकडून तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे.