देशभरातल्या धरणांमधली पाण्याची पातळी 23 टक्क्यांवर
By admin | Published: April 19, 2016 07:28 PM2016-04-19T19:28:11+5:302016-04-19T19:28:11+5:30
देशातल्या धरणांमध्ये 13 एप्रिलपर्यंत फक्त 35.839 बिलियन क्युबिक मीटर पाणी शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९- देशातल्या धरणांमध्ये 13 एप्रिलपर्यंत फक्त 35.839 बिलियन क्युबिक मीटर पाणी शिल्लक असल्याची माहिती केंद्रीय जलसंधारण मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. या धरणांची पाणी साठवण क्षमता जवळपास 157.799 बिलियन क्युबिक मीटर इतकी आहे. जवळपास 91 मोठ्या प्रकल्पांत क्षमतेपेक्षा 23 टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याची धक्कादायक माहिती जलसंधारण मंत्रालयानं दिली आहे.
गेल्यावर्षी याच काळात या धरणांमध्ये 33 टक्के पाणीसाठा शिल्लक होता. जवळपास 10 वर्षांत पहिल्यांदाच पाण्याची पातळी एवढी खालावल्याचं समोर आलं आहे. हिमाचल प्रदेश, तेलंगणा, पंजाब, वेस्ट बंगाल, ओडिशा, राजस्थान, झारखंड, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तामिळनाडू, कर्नाटक, केरळ या राज्यांमधल्या धरणांमधली पाणीपातळी कमालीची खालावली आहे. तर आंध्र प्रदेश आणि त्रिपुरा या दोन राज्यांतल्या धरणांमध्ये फक्त पाण्याची पातळी समाधानकारक आहे.
And now,50 wagons being filled up with drinking water at a time atMiraj;25lakh lit water to be sent to Latur at once pic.twitter.com/AIpI8rNcvR
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) April 19, 2016