पाण्याची नासाडी थांबणार...
By admin | Published: May 16, 2016 12:44 AM2016-05-16T00:44:25+5:302016-05-16T00:44:25+5:30
गळती रोखण्यासंदर्भात यापूर्वी सरकारी तज्ज्ञांची मदत घेण्यात आली होती. ही गळती नेमकी कुठून होते, मात्र याचे निदान होऊ शकले नव्हते. आता जैन उद्योग समूह, क्रेडाई व इंजिनिअर्स असोसिएशनने पुढाकार घेतल्याने हे संपूर्ण काम होत आहे. या खोदकामात मिळालेल्या जुन्या पाईपलाईन व व्हॉल्व्हमुळे ही गळती होऊन तलावातून गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यवधी लिटर्स अमूल्य पाणी अक्षरश: वाया जात होते. पाण्याची ही नासाडी रोखण्यासाठी जैन इरिगेशनच्या बांधकाम विभागाचे सहकारी कार्यरत आहेत. गळती रोखण्यासाठी जुनी पाईपलाईन, व्हॉल्व्ह आहे त्याच ठिकाणी ठेऊन झाकण बसविणे, पाणी गळती होऊ नये यासाठी त्यावर वॉटरफ्रुफ काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या कामात जैन इरिगेशनचे पोकलेन्स, डंपर, अभियंते, सहकारी गेल्या तीन दिवसांपासून व्यस्त असून दोन-तीन दिवसांत हे काम पूर्णत्वास येईल असा अंदाज आहे. स्
Next
ग ती रोखण्यासंदर्भात यापूर्वी सरकारी तज्ज्ञांची मदत घेण्यात आली होती. ही गळती नेमकी कुठून होते, मात्र याचे निदान होऊ शकले नव्हते. आता जैन उद्योग समूह, क्रेडाई व इंजिनिअर्स असोसिएशनने पुढाकार घेतल्याने हे संपूर्ण काम होत आहे. या खोदकामात मिळालेल्या जुन्या पाईपलाईन व व्हॉल्व्हमुळे ही गळती होऊन तलावातून गेल्या अनेक वर्षांपासून कोट्यवधी लिटर्स अमूल्य पाणी अक्षरश: वाया जात होते. पाण्याची ही नासाडी रोखण्यासाठी जैन इरिगेशनच्या बांधकाम विभागाचे सहकारी कार्यरत आहेत. गळती रोखण्यासाठी जुनी पाईपलाईन, व्हॉल्व्ह आहे त्याच ठिकाणी ठेऊन झाकण बसविणे, पाणी गळती होऊ नये यासाठी त्यावर वॉटरफ्रुफ काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. या कामात जैन इरिगेशनचे पोकलेन्स, डंपर, अभियंते, सहकारी गेल्या तीन दिवसांपासून व्यस्त असून दोन-तीन दिवसांत हे काम पूर्णत्वास येईल असा अंदाज आहे. सामाजिक बांधिलकी मानून जैन इरिगेशनने मेहरुण तलावाची गळती रोखण्यासाठी कृतीशील पाऊल उचलून प्रत्यक्ष काम सुरू केले. याबाबत महापौर नितीन ला यांनी जैन इरिगेशनच्या या कार्याचे स्वागत केले. गळतीची पाहणी....जैन इरिगेशनने युद्धपातळीवर कामाच्या नियोजनुसार प्राथमिक काम तीन दिवसांत पूर्ण केले आहे. आता गळती रोखण्याच्या उपाययोजना १६ पासून करण्यात येणार आहे. येत्या दोन तीन दिवसांत गळती संपूर्णपणे बंद होऊन कोट्यवधी लिटर्स पाणी वाया न जाता तलावातच थांबेल अशी माहिती जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी कामाची पाहणी करताना दिली. त्यांच्यासमवेत महापौर नितीन ला, क्रेडाईचे अध्यक्ष अनिष शहा, जळगाव सिव्हिल इंजिनियर असोसिएशनचे अध्यक्ष भरत अमळकर, सभापती नितीन बरडे आदी उपस्थित होते. या कामामुळे आता येत्या दोन तीन दिवसांत गळती संपूर्णपणे बंद होऊन कोट्यवधी लिटर्स पाणी वाया न जाता तलावातच थांबेल.-अशोक जैन, अध्यक्ष, जैन इरिगेशन.ब्रिटीश काळात पाणीपुरवठा करण्यासाठी करण्यात आलेली ही योजना होती. तलावातील पाणी गोळा करण्याचा विहीर सदृष्य तो एक खड्डा आहे. तो एक प्रकारचा जॅकवेलच असून पाणी उचलण्यासाठी त्याचा वापर होतो. -भरत अमळकर, अध्यक्ष, जळगाव सिव्हिल इंजिनियर असोसिएशन.ब्रिटीश काळातील पाणीपुरवठा योजनेचा हा एक भाग असावा. त्याला सम्प अथवा चेंबर असेही म्हणता येईल. - अनिष शहा, अध्यक्ष, क्रेडाई