पाण्यासाठी करावी लागणार रात्रीची जागरणे पाणीकपात : महापालिकेकडून पाण्याचे वेळापत्रक जाहीर

By admin | Published: September 4, 2015 10:45 PM2015-09-04T22:45:09+5:302015-09-04T22:45:09+5:30

पुणे : शहराच्या पाण्यामध्ये ३० टक्के कपात करून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीष बापट यांनी जाहीर केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडून शहराला केल्या जाणार्‍या पाणीपुरवठयाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये रेंजहिल्स, मरीआई गेट परिसर, पुणे विद्यापीठ परिसर, पंचवटी, पाषाण परिसराला रात्री ११ ते पहाटे ३ या वेळेत पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांना जागरण करावी लागणार आहेत.

Water needs to be done for water. Watercolors: Announcement of water schedule by municipal corporation | पाण्यासाठी करावी लागणार रात्रीची जागरणे पाणीकपात : महापालिकेकडून पाण्याचे वेळापत्रक जाहीर

पाण्यासाठी करावी लागणार रात्रीची जागरणे पाणीकपात : महापालिकेकडून पाण्याचे वेळापत्रक जाहीर

Next
णे : शहराच्या पाण्यामध्ये ३० टक्के कपात करून दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालकमंत्री गिरीष बापट यांनी जाहीर केल्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडून शहराला केल्या जाणार्‍या पाणीपुरवठयाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामध्ये रेंजहिल्स, मरीआई गेट परिसर, पुणे विद्यापीठ परिसर, पंचवटी, पाषाण परिसराला रात्री ११ ते पहाटे ३ या वेळेत पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांना जागरण करावी लागणार आहेत.
शहराला स्वारगेट, लष्कर, पर्वती, एसएनडीटी, वारजे, नवीन होळकर, वडगाव या केंद्रामार्फत पाणीपुरवठा केला जातो.
सोमवार, बुधवार व शुक्रवारी वेगवेगळया वेळांमध्ये पाणीपुरवठा होणार भाग : बंडगार्डन विभागात येरवडा, कलवडवस्ती, आळंदी रोड, कल्याणीनगर, विमाननगर, कोरेगाव पार्क, पाटील इस्टेट, शिवाजीनगर, मंगळवार पेठ यांना पुर्वीप्रमाणच्या वेळेत पाणीपुरवठा होईल. चंदननगर, वडगावशेरी, चौधरी वस्ती, थिटेनगर, खुळेवाडी, खराडकर पार्क अभिरूची मॉल, हिंगणे परिसर, आपटे कॉलनी, खंडोबा परिसर, धायरी, डीएसके पायथा, साळंुखे विहार, कुदळे पार्क, विक्रांत पॅलेस, गोविंद अपार्टमेंट, विठठ्लवाडी, महालक्ष्मी सोसायटी, दिनकर पठारे वस्ती, मारूतीनगर, माणिकबाग या परिसरामध्ये वेगवेगळया वेळांमध्ये पाणीपुरवठा होईल.
मंगळवार, गुरूवार व शनिवारी पाणीपुरवठा होणारा भाग : स्वारगेट जलकेंद्रातील दांडेकर पूल, सर्व पेठा, राजाराम पूलाच्या अलीकडील भाग यांना सकाळी ५ ते ९ या वेळेत पाणीपुरवठा होणार आहे. लष्कर विभागात मगरपटट, केशवनगर, मुंढवा, महंमदवाडी, वानवडी, कोंढवा गावठाण, कॅम्प, ससून हॉस्पिटल येथे पुर्वीप्रमाणच्या वेळेत पाणीपुरवठा होईल. एसएनडीटी विभागामध्ये रामबाग कॉलनी काशीनाथ सोसायटी, मोहोळ चौक, मोरे विद्यालय, हनुमान नगर या परिसरात सकाळी ५ ते ९ यावेळेतपाणीपुरवठा होईल. कोथरूड गावठाण, डहाणुकर कॉलनी, गुजराथ कॉलनी, करिष्मा सोसायटी, मयुर कॉलनी, नळस्टॉप मंगेशकर हॉस्पिटल, सुतारदरा, कर्वेनगर कॅनॉल, म्हाडा वसाहत, पर्वती दर्शन, मुकुंद नगर, सहकारनगर पोलीस स्टेशन परिसर, शिवाजीनगर गावठाण, बोपोडी, औंध रोड, कामगार पुतळा येथील परिसरामध्ये वेगवेगळया वेळांमध्ये पाणीपुरवठा होणार आहे.

चौकट
येथे होणार दररोज पाणी पुरवठा
शहरामध्ये सगळीकडे एकदिवसाआड पाणीपुरवठा होणार असला तरी पुढील काही भागांमध्ये तांत्रिक कारणांमुळे दररोज पाणीपुरवठा होणार आहे. कोंढवा, साईनगर, गजानन महाराजनगर, काकडेवस्ती, अप्पर इंदिरानगर, बालाजीनगर, काशीनाथ पाटील नगर, एलोरा परिसर, भारती विद्यापीठ, भारती विहार, श्रीराम निवास, धनकवडी गावठाण, साईदत्तनगर, कृष्णमाई सोसायटी, आंबेगावर पठार, दत्तनगर, सहकारनगर यांना पाणीकपातीची झळ बसणार नाही.

Web Title: Water needs to be done for water. Watercolors: Announcement of water schedule by municipal corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.