कोयनेतून कर्नाटकला सोडलेले पाणी उद्यापासून बंद

By Admin | Published: April 29, 2016 03:01 AM2016-04-29T03:01:07+5:302016-04-29T03:01:07+5:30

कोयना धरणातून एक टीएमसी पाणी सोडण्यात आल्यानंतर आणखी एक टीएमसी पाण्याची मागणी कर्नाटकने केली आहे.

The water released from Karnataka to Karnataka is closed from tomorrow | कोयनेतून कर्नाटकला सोडलेले पाणी उद्यापासून बंद

कोयनेतून कर्नाटकला सोडलेले पाणी उद्यापासून बंद

googlenewsNext

सदानंद औंधे,

मिरज-कोयना धरणातून एक टीएमसी पाणी सोडण्यात आल्यानंतर आणखी एक टीएमसी पाण्याची मागणी कर्नाटकने केली आहे. मात्र, राज्य शासनाने आणखी पाणी सोडण्याबाबत असमर्थता दर्शवून अक्कलकोटला पाणी सोडण्याची मागणी केली आहे. उद्या, शनिवारपासून कोयनेतून कर्नाटकसाठी सोडण्यात येणारे पाणी बंद करण्यात येणार आहे.
कर्नाटक सीमाभागात तीव्र पाणीटंचाई असल्याने बुधवारपासून कोयना व वारणा धरणांतून एक टीएमसी पाणी सोडले. कर्नाटकातील जमखंडीजवळ हिप्परगी धरणापर्यंत हे पाणी पोहोचले. राजापूर बंधाऱ्यातून ६०० एमसीएफटी पाणी कर्नाटकात गेले असून, उद्यापर्यंत एक टीएमसी पाणी कर्नाटकात पोहोचणार असल्याचे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सांगितले. हिप्परगी धरणात आणखी एक टीएमसी पाणी सोडावे यासाठी कर्नाटकच्या शिष्टमंडळाने मुंबईत तळ ठोकला आहे. परंतु वेळेत पाऊस पडला नाही, तर पाणी आवश्यक असल्याने कर्नाटकला आणखी पाणी देण्यास जलसंपदा विभागाने असमर्थता दर्शविली आहे.
देवाण-घेवाण करणार
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बेळगावसह अन्य दुष्काळी भागाचा दौरा करून पाणीटंचाईची समस्या दूर करण्यासाठी यापुढे दरवर्षी महाराष्ट्रासोबत चार टीएमसी पाण्याची देवाण-घेवाण करू, असे जाहीर केले. गुरुवारी बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जिल्हाधिकारी एन. जयराम यांनी उगार येथे पाहणी करून महाराष्ट्रातून आणखी पाणी उपलब्ध करण्याचे आश्वासन दिले.

Web Title: The water released from Karnataka to Karnataka is closed from tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.