राज्यांकडून मागवली जलसाठ्याची माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 06:23 AM2019-11-12T06:23:38+5:302019-11-12T06:23:42+5:30
जलशक्ती मंत्रालयाने सर्व राज्यांना उपलब्ध जलसाठ्याच्या आकडेवारीची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत.
नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : जलशक्ती मंत्रालयाने सर्व राज्यांना उपलब्ध जलसाठ्याच्या आकडेवारीची माहिती देण्याचे निर्देश दिले आहेत. राज्य सरकारने दररोज माहिती व्यवस्थापन प्रणालीमार्फत (आयएमआयएस) उपलब्ध जलसाठ्याची माहिती अद्ययावत करण्याचे सांगूनही काही राज्य यात चालढकल करीत आहेत.
८ नोव्हेंबर रोजी राज्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला होता. यावेळी अधिकाऱ्यांनी सांगितले की, महाराष्टÑासह अनेक राज्य दैनिकआधारे उपलब्ध जलसाठ्याची माहिती अद्ययावत केली जात आहे.
जलशक्ती मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी अविनाश कुमार सिन्हा यांच्या वतीने यासंदर्भात सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठविल्यात आले आहे. १८ नोव्हेंबरपासून संसदेचे अधिवेशन सुरू होत आहे. संसदेत राष्टÑीय पेयजल कार्यक्रमातहत राबविण्यात येत असलेल्या जल जीवन अभियानाबाबत विचारण्यात येणाºया प्रश्नांची उत्तरे या माहितीच्या आधारे तयार करायचे आहेत. तेव्हा ही माहिती आयएमआयएसमध्ये अद्ययावत करण्यात यावी, असे निर्देश या पत्रातून देण्यात आले आहेत. यासाठी १४ नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे.