पाणी टंचाईचा भार मात्र दातृत्वाचा आधार ट्युबवेलद्वारे पाणी : वाणी कुटुंबीयांनी दिले गावाला पाणी
By admin | Published: March 29, 2016 12:24 AM2016-03-29T00:24:52+5:302016-03-29T00:24:52+5:30
शिरसोली - अत्यल्प झालेल्या पावसामुळे शिरसोली गावाला पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. पाणी टंचाईचा भार ग्रामस्थ सहन करीत असताना गावातीलच काही नागरिकांनी आपल्या शेतातील विहीर तसेच स्वखर्चाने केलेले बोअरवेल नागरिकांसाठी खुले केले आहे. नागरिकांच्या या दातृत्त्वामुळे शिरसोलीकरांना किंचित आधार मिळत आहे.
Next
श रसोली - अत्यल्प झालेल्या पावसामुळे शिरसोली गावाला पाणी टंचाईच्या झळा बसत आहेत. पाणी टंचाईचा भार ग्रामस्थ सहन करीत असताना गावातीलच काही नागरिकांनी आपल्या शेतातील विहीर तसेच स्वखर्चाने केलेले बोअरवेल नागरिकांसाठी खुले केले आहे. नागरिकांच्या या दातृत्त्वामुळे शिरसोलीकरांना किंचित आधार मिळत आहे.महिन्यातून एक वेळा पाणीगिरणा नदीचे पाण्याचे आवर्तन दापोरा बंधार्यापर्यंत न आल्याने शिरसोली, म्हसावद, दापोरा, मोहाडी या गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट झाला आहे. शिरसोली प्र.न. या गावात महिन्यातून एक वेळा पाणी येत आहे. तर शिरसोली प्र.बो. या गावात १५ दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. एप्रिल व मे महिन्यात भीषण पाणी टंचाईला ग्रामस्थांना सामोरे जावे लागणार आहे. त्या अनुषंगाने ग्रामपंचायतीतर्फे पाण्याचा स्त्रोत शोधण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.वाणी यांनी गावासाठी दिले पाणीपाण्याचे स्त्रोत संपले असताना शिरसोली येथील रहिवासी दिलीप अनंत वाणी यांनी आपल्या शेतातील विहिरीतून पाणी देण्याची तयारी दर्शविली आहे.त्यानुसार वाणी यांच्या शेतातील विहिरीचे पाणी हे ग्रामपंचायतीच्या विहिरीत सोडण्यात येत आहे.बोरींगद्वारे देताहेत मोफत पाणीदिलीप वाणी यांच्यासोबतच शिरसोली गावातील पूनमचंद मराठे (चव्हाण, अशफाक पिंजारी, दयाराम धामणे, मुस्तक पिंजारी, रामकृष्ण जगन्नाथ ताडे, शिरसोली प्र.बो. व शिरसोली प्र.न. येथील बारी पंच मंडळातर्फे स्वखर्चाने केलेल्या बोरींगद्वारे ग्रामस्थांना पिण्याचे पाणी पुरविले जात आहे.युवाशक्ती फाउंडेशनची मदतजळगाव येथील युवाशक्ती फाउंडेशनतर्फे पारंपरिक होळी किंवा रेन डान्सचा उपक्रम यावर्षी साजरा न करता तीन टँकर पाणी हे शिरसोली गावात वाटप करण्यात आले. युवाशक्तीतर्फे प्रत्येक रविवारी तीन टँकर पाणी देण्याचे यापूर्वी जाहीर करण्यात आले आहे. चंगळवादाकडे झुकत असलेल्या आजची पिढी ही समाजाच्या व्यथा आणि गरजांबाबत जागृत राहून मदतीसाठी पुढाकार घेत असल्याबाबत शिरसोली ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.(वार्ताहर)