पाणीपुरवठा पुन्हा दोन दिवस लांबणीवर दोन पाईप आढळले खराब : दुरूस्तीच्या कामास विलंब; २३ रोजीचा पाणीपुरवठा होणार २६ रोजी

By admin | Published: January 24, 2016 10:19 PM2016-01-24T22:19:57+5:302016-01-24T22:19:57+5:30

सोबत फोटो-

Water supply again found two pipes for a deficit of two days: Due to the repair work; Water supply to 23rd on 26th | पाणीपुरवठा पुन्हा दोन दिवस लांबणीवर दोन पाईप आढळले खराब : दुरूस्तीच्या कामास विलंब; २३ रोजीचा पाणीपुरवठा होणार २६ रोजी

पाणीपुरवठा पुन्हा दोन दिवस लांबणीवर दोन पाईप आढळले खराब : दुरूस्तीच्या कामास विलंब; २३ रोजीचा पाणीपुरवठा होणार २६ रोजी

Next
बत फोटो-

जळगाव : मनपाच्या वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या १२०० मीमी मुख्य जलवाहिनीला मेहरूणमधील लक्ष्मीनगर येथे लागलेली गळती दुरुस्तीसाठी एक पाईप बदलण्याच्या अंदाजाने सुरू केलेले काम आणखी दोन पाईप खराब आढळल्याने लांबले आहे. त्यामुळे आधी १ दिवस पुढे ढकललेला पाणीपुरवठा आणखी दोन दिवस विलंबाने होणार आहे. म्हणजेच २३ रोजीचा पाणीपुरवठा २६ रोजी होईल. त्यामुळे नागरिकांची प्रचंड गैरसोय होणार आहे.
मेहरूण लक्ष्मीनगर येथील १२०० मीमी पीएचसी पाईपला गळती लागल्याने त्याच्या दुरुस्तीचे काम २२ रोजी हाती घेण्यात आले. गळतीचा शोध घेण्यासाठी ३ ते ४ ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने खड्डे खोदूनही गळती सापडत नसल्याने अखेर मॅन होलमधून कामगारास पाईपलाईनमध्ये उतरवून गळतीचा शोध घेण्यात आला. त्यावेळी एक नव्हे तर तब्बल ३ पाईप खराब झालेले आढळून आले. त्यामुळे त्या ठिकाणी नवीन तीन लोखंडी पाईप टाकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खोदकाम करावे लागत आहे. तसेच पाण्याचा उपसाही करावा लागत आहे. रविवारी सायंकाळपर्यंत पाणी उपसत खड्डा करण्याचे काम सुरू होते.


तीन लोखंडी पाईप जोडण्याचे काम सुरु
गळती लागलेले तीन पाईप काढून त्या जागी लोखंडी तीन पाईप वेल्डींगने जोडून टाकण्यात येणार आहेत. त्यासाठी हे तीन लोखंडी पाईप वेल्डींगने एकमेकांना जोडण्याचे कामही या ठिकाणी रस्त्यावर सुरू होते.

इन्फो-
पाणी व थंडीचा अडसर
गळती लागलेले ठिकाण नाल्याच्या काठावरच असल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी पाझरून पाईपलाईनसाठीच्या खड्ड्यात येत असल्याने त्याचा सतत ४ पंप लावून उपसा करावा लागत आहे. त्यातच थंडीचा कडाकाही असल्याने दुरुस्ती कामात अडथळा निर्माण होत आहे.

इन्फो-
आणखी ३६ तास लागणार
दुरुस्तीचे काम हाती घेताना एकच पाईप बदलविणे अपेक्षित होते त्यानुसारच पाणीपुरवठा विभागाने नियोजन करून १ दिवसच पाणीपुरवठा पुढे ढकलला होता. मात्र आणखी दोन पाईप खराब असल्याचे निदर्शनास आल्याने तीन पाईप तोडून काढून त्यासाठी नवीन तीन पाईप टाकण्यास आणखी ३६ तास लागणार आहेत. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठा ३ दिवस पुढे ढकलण्यात आला आहे.

Web Title: Water supply again found two pipes for a deficit of two days: Due to the repair work; Water supply to 23rd on 26th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.