शहरात पाणी पुरवठ्याची बोंबाबोंब प्रशासन हतबल: कधी गळती तर कधी विजेची सबब, पाणी पुरवठा एक दिवस पुढे
By admin | Published: December 12, 2015 06:34 PM2015-12-12T18:34:24+5:302015-12-12T18:34:24+5:30
जळगाव : पाईप लाईनची वारंवार गळती तर कधी वीज पुरवठ्याचा व्यत्यय यामुळे शहरातील पाणी पुरवठा सतत विस्कळीत होत आहे. गेल्या पंधरा दिवसातच दोन वेळा पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. तर शनिवारीही वीज पुरवठ्यातील व्यत्ययामुळे शहरास पाणी पुरवठा होऊ शकला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
Next
ज गाव : पाईप लाईनची वारंवार गळती तर कधी वीज पुरवठ्याचा व्यत्यय यामुळे शहरातील पाणी पुरवठा सतत विस्कळीत होत आहे. गेल्या पंधरा दिवसातच दोन वेळा पाणी पुरवठा होऊ शकलेला नाही. तर शनिवारीही वीज पुरवठ्यातील व्यत्ययामुळे शहरास पाणी पुरवठा होऊ शकला नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. शहरात दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी मनपाने पाणी मागितले तरीही ते देण्याइतका पाणीसाठा वाघूर मध्ये असल्याचा दावा जिल्हाधिकार्यांनी केला होता. मात्र मनपाला वितरण व्यवस्थेतील त्रुटीमुळे ते शक्य नसल्याचे महापालिका पाणी पुरवठा विभाकडून स्पष्ट करण्यात आले होते. वाघूर धरणात यंदा पुरेसा पाणीसाठा आहे. त्यामुळे जर मनपाने मागणी केली तर दररोजदेखील पाणीपुरवठा करण्याइतका पाणीसाठा उपलब्ध करून देऊ, असे विधान जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी पाणी आरक्षण आढावा बैठकीत केले होते. त्यामुळे याबाबत मनपाच्या संबंधित अधिकार्यांना याबाबत विचारणा केली असता दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी मनपाची वितरण व्यवस्था अपुरी आहे. सध्या दोन दिवसांआड पाणीपुरवठा सुरू आहे. मात्र जास्तीत जास्त १ दिवसाआड पाणीपुरवठा करता येऊ शकतो. कारण मनपाच्या वाघूर योजनेच्या पंपांची क्षमता १०८ एमएलडी इतकी आहे. त्याद्वारे दररोज ८० एमएलडी पाणी दररोज उचलले जाते. त्यातून दोन दिवसांआड पाणीपुरवठा होत असल्याचे पाणी पुरवठा विभागाच्या सूत्रांनी सांगितले होते. गळतीचे प्रकार झाले नित्त्याचेगेल्या पंधरा दिवसातच दोन वेळा पाणी पुरवठ्यात व्यत्यय आल्याचे प्रकार घडले आहेत. गेल्या महिन्यात म्हणजे २५ नोव्हेंबरला मेहरूण परिसरात १२०० मीटर व्यासाच्या पाईप लाईनला गळती लागली होती. दोन दिवस हे कामकाज चालले. त्यानंतर २८,२९ ला शहरातील पाणी पुरवठा सुरळीत झाला. त्यानंतर आठवडाभरातच म्हणजे ५ डिसेंबरला पुन्हा पाईप लाईनला गळती लागली. मेहरूण स्मशानभूमीलगत ही गळती लागली होती. त्यामुळे पाईप लाईन दुरुस्तीचे काम दोन दिवस सुरू होते. त्यामुळे सात डिसेंबरला पाणी पुरवठा सुरू झाला.