दुपारी २ वाजता सुरू झाला पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2016 10:25 PM2016-03-11T22:25:18+5:302016-03-11T22:25:18+5:30

(पाणीपुरवठा बातमी जोड)

Water supply started at 2 o'clock in the afternoon | दुपारी २ वाजता सुरू झाला पाणीपुरवठा

दुपारी २ वाजता सुरू झाला पाणीपुरवठा

Next
(प
ाणीपुरवठा बातमी जोड)
दुरूस्ती पूर्ण झाल्यावर एमबीआर जलकुंभातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. तो गिरणा टाकीपर्यंत पोहोचायला दुपारचे दोन वाजले. त्यानंतर गिरणा टाकी भरायला अडीच-तीन तासांचा कालावधी लागला. दरम्यान दुपारी २ वाजेपासूनच वाघूर जलवाहिनीवरून थेट खेडी व अयोध्यानगर, मेहरूण परिसरात पाणीपुरवठा करण्यात आला. सायंकाळी ५ वाजता गिरणा टाकी भरल्यानंतर इतर टाक्या भरून सुधारीत वेळापत्रकानुसार शुक्रवारी पाणीपुरवठा नियोजित असलेल्या भागात पाणीपुरवठा सुरू करण्यात आला. रात्रभरात हा पाणीपुरवठा पूर्ण केला जाणार आहे. त्यात वाल्मीकनगर, कांचननगर, दिनकरनगर, आसोदारोड व परिसर, मेहरूण परिसर पहिला दिवस- रामेश्वर कॉलनी, एमडीएस कॉलनी, मास्टर कॉलनी, अक्सानगर परिसर. अयोध्यानगर परिसर- शांतीनिकेतन, गृहकुल कॉलनी, म्हाडा कॉलनी, अजिंठा सोसायटी, नित्यानंदनगर टाकीपरिसर- मोहननगर, नेहरूनगर परिसर. खंडेरावनगर परिसर- हरीविठ्ठलनगर, पिंप्राळा गावठाण परिसर. मानराज टाकीवरील भाग-दांडेकरनगर, मानराजपार्क, आसावानगर, निसर्गकॉलनी. खोटेनगर टाकीवरील भाग- द्रौपदीनगर, मुक्ताईनगर, धनश्रीनगर, पोलीस कॉलनी परिसर, खोटेनगर. गेंदालालमिल टाकीवरील- शिवाजीनगर हुडको, प्रजापतनगर, एसएमआयटी परिसर. योगेश्वरनगर, हिरा पाईप, शंकरराव नगर व खेडीगाव डीएसपी बायपास पहिला दिवस- तांबापुरा, शामा फायरसमोरील परिसर. गिरणा टाकी आवारातील उंच टाकी-वाघनगर, हरिविठ्ठलनगर, शिवकॉलनी, विद्युत कॉलनी, राका पार्क, पोस्टल कॉलनी, विवेकानंदनगर व इतर भाग. डीएसपी टाकी पहिला दिवस- जिल्हा रोड, रामदास कॉलनी, शारदा कॉलनी, महाबळ कॉलनी परिसर. ऑफीसर क्लब टाकी परिसर या परिसरात रात्री उशीरापर्यंत पाणीपुरवठा करण्याचे काम सुरू ह ोते.
शनिवारचा पाणीपुरवठा उशीराने
शनिवारी सुधारीत वेळापत्रकानुसार खंडेरावनगर दुसरा दिवस-पिंप्राळा गावठाण, उर्वरीत भाग, पिंप्राळा हुडको, सेंट्रल बँक कॉलनी, आशाबाबानगर, मानराज टाकी दुसरा दिवस- शिंदेनगर, अष्टभुजा, वाटीकाश्रम परिसरातील राहिलेला भाग.
खोटेनगर टाकीवरील राहिलेला भाग- निवृत्तीनगर, कल्याणीनगर, दादावाडी, हिराशिवा, आहुजानगर, निमखेडी भागातील राहिलेला परिसर
नित्यानंद टाकी दुसरा दिवस- नित्यानंदनगर, संभाजीनगर, रायसोनीनगर, समतानगर परिसरातील उर्वरीत भाग.
डीएसपी टाकी- सानेगुरूजी कॉलनी, पार्वतीनगर, शिवरामनगर,यशवंतनगर परिसरातील उर्वरीत भाग. गिरणा टाकी आवारातील उंच टाकी, भगवाननगर, रामानंदनगर, कोल्हेनगर, अंबिका सोसायटी, शिवकॉलनी व इतर परिसर, गणेश कॉलनी, श्रीकृष्ण कॉलनी परिसरातील उर्वरीत भाग. या परिसरात पाणीपुरवठा नियोजित आहे. मात्र शुक्रवारचा पाणीपुरवठाच रात्री उशीरापर्यंत चालल्याने शनिवारचा पाणीपुरवठा दुपारून उशीराने केला जाणार असल्याची माहिती पाणीपुरवठा अभियंता डी.एस.खडके यांनी दिली.
रविवारचा पाणीपुरवठा
रविवारी नटराज टाकी ते चौघुले मळापर्यंतचा भाग, शनीपेठ, बळीराम पेठ, नवीपेठ, हौसिंग सोसायटी, शाहूनगर, प्रतापनगर, गेंदालाल मिल टाकीवरील भाग, खडकेचाळ, इंद्रप्रस्थनगर, के.सी. पार्क, गेंदालाल मिल हुडको,
रिंगरोड संपूर्ण- भोईटेनगर, भिकमचंद जैन नगर,
आकाशवाणी टाकीवरील संपूर्ण भाग- जुनेगाव, सिंधी कॉलनी, इंडिया गॅरेज, ओंकारनगर, जोशीपेठ,
हेमुकलाणी टाकीवरील परिसर- गणेशवाडी, कासमवाडी, सम्राट कॉलनी, ईश्वर कॉलनी, वर्षा कॉलनी व इतर परिसर. सुप्रिम कॉलनी परिसर.
डीएसपी टाकीवरून पहिला दिवस- तांबापुरा, गणपतीनगर, आदर्शनगर व इतर परिसर. १५ इंची व्हॉल्व- प्रभात कॉलनी, ब्रुकबॉण्ड कॉलनीया परिसरात पाणीपुरवठा केलाजाणारआहे.

Web Title: Water supply started at 2 o'clock in the afternoon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.