सासवड नगरपालिकेमार्फत पाणीपुरवठा सुरळीत
By Admin | Published: June 8, 2016 01:50 AM2016-06-08T01:50:31+5:302016-06-08T01:50:31+5:30
सासवड : सासवड शहराला सध्या फक्त वीर धरण योजनेतून पाणीपुरवठा होत आहे; परंतु गेले ४ ते ५ दिवस वीर धरण व कांबळवाडी परिसरातील वीजपुरवठा वादळ व पाऊस यामुळे खंडित झाला, त्यामुळे सासवड शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सातारा जिल्हा व पुरंदर तालुक्यामधील महावितरणच्या अधिकार्यांनी दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर केल्याने आता पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांनी दिली.
स सवड : सासवड शहराला सध्या फक्त वीर धरण योजनेतून पाणीपुरवठा होत आहे; परंतु गेले ४ ते ५ दिवस वीर धरण व कांबळवाडी परिसरातील वीजपुरवठा वादळ व पाऊस यामुळे खंडित झाला, त्यामुळे सासवड शहराला पाणीपुरवठा होऊ शकला नाही. सातारा जिल्हा व पुरंदर तालुक्यामधील महावितरणच्या अधिकार्यांनी दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर केल्याने आता पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे, अशी माहिती नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप यांनी दिली. सासवडचा पाणीपुरवठा विजेअभावी बंद झाल्यावर, नगराध्यक्षांनी संपर्क साधला, अधिकारी व कर्मचारी यांनी त्वरित कामे करून वीजपुरवठा सुरू केला. रविवार, दि. ५ जून, दुपारी १ पासून पाणीपुरवठा सुरू झाला व सोमवारपासून पाणी शहरास मिळू लागले. ज्या नागरिकांना पाणी मिळाले नाही, त्यांना पाणी द्यावे, असे आवाहन सासवडमधील टँकरमालकांना करण्यात आले. त्यास प्रतिसाद देऊन सासवडमधील प्रमोद बोरावके, वसंत बोरावके, संतोष जगताप, नितीन भोंगळे, विलास गिरमे, पुरंदर मिल्क प्रोडक्ट यांनी पाण्यासह टँंकर दिले. ते पाणी नागरिकांना देण्यात आले. यापुढे गरज भासल्यास सहकार्य करण्याची तयारी दर्शविली. नगरपालिकेने त्यांचे आभार मानले. दरम्यान, सासवड शहराला या टंचाईकाळात घोरवडी धरणातून पाणी द्यावे, असे आवाहन नगराध्यक्षा यांनी दूरध्वनीवरून जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांना केले. त्यास प्रतिसाद मिळाला नाही, असेही नगराध्यक्षा यांनी सांगितले . सासवडच्या पाणी पुरवठ्याबाबत नगरपालिका दवंडीद्वारे नागरिकांना माहिती देत असते. वस्तुस्थिती माहिती झाल्याने नागरिकही तक्रार न करता सहकार्य करतात, असे नगराध्यक्ष म्हणाल्या. पाणीटंचाई काळात महावितरणचे अधिकारी, सासवड नगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी रात्रंदिवस काम करून पाणीपुरवठा करतात. त्यांना नगर पालिकेने धन्यवाद दिले आहेत.