शिरसोली प्र.न.मध्ये टँकरने पाणी पुरवठा दिलासा : तात्पुरत्या पाणी योजनेसाठी प्रस्तावाची तयारी
By admin | Published: March 21, 2016 12:21 AM2016-03-21T00:21:44+5:302016-03-21T00:21:44+5:30
शिरसोली : शिरसोली प्र.न.मध्ये असलेल्या भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने टँकरने पाणी पुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तात्पुरत्या पाणी योजनेसाठी ग्रामपंचायतीने प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली आहे.
Next
श रसोली : शिरसोली प्र.न.मध्ये असलेल्या भीषण पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने टँकरने पाणी पुरवठा सुरु केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तात्पुरत्या पाणी योजनेसाठी ग्रामपंचायतीने प्रस्ताव तयार करण्यास सुरुवात केली आहे.तालुक्यातील शिरसोली प्र.न.ही मोठी ग्रामपंचायत आहे. दुष्काळीस्थिती व योग्य नियोजनाच्या अभावामुळे गावात तब्बल २५ ते ३० दिवसाआड पाणी पुरवठा होत होता. ग्रामपंचायतीने या गावात टँकरने पाणी पुरवठा व्हावा यासाठी गटविकास अधिकार्यांकडे प्रस्ताव सादर केला होता. टंचाई शाखेने मान्यता दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. त्यामुळे जलसंपदा विभागाच्या मोठ्या टँकरच्या साहाय्याने पाणी पुरवठा केला जात आहे.टँकरचे पाणी गावाला पाणी पुरवठा करणार्या सार्वजनिक पाण्याच्या टाकीत ओतून त्या द्वारे गावात पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे टंचाईच्या झळांपासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.नायगाव धरणापासून पाणी योजनागिरणा नदी परिसरातील शिरसोली गावाच्या सामूहिक पाणी योजनेचा पाण्याचा स्त्रोत कमी झाल्यामुळे शिरसोली प्र.न.ग्रामपंचायतीने नायगाव धरणावरून पाणी आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहे. या ठिकाणावरून तात्पुरती पाणी योजना राबविण्यासाठी ग्रामपंचायतीने प्रस्ताव तयार करणे सुरु केले आहे. निवासी उपजिल्हाधिकारी यांनी प्रस्ताव सादर केल्यास १० लाखांपर्यंत मंजुरी देण्याचे आश्वासन दिले आहे. उर्वरित काम हे जैन उद्योग समुहाचे उपाध्यक्ष अशोक जैन यांनी करण्याचे आश्वासन दिले आहे. ग्रामपंचायतीकडे १२ व्या वित्त आयोगाचा १० ते १२ लाखांचा निधी आहे. यासार्या माध्यमातून तात्पुरती पाणी योजना राबविण्यात येणार असल्याचे सरपंच अर्जुन काटोले यांनी सांगितले.