आज दुपारनंतर होणार पाणीपुरवठा अखेर दुरुस्ती पूर्ण : शुक्रवारी उशीरा झाला पाणीपुरवठा; नागरिकांचे प्रचंड हाल
By admin | Published: March 11, 2016 10:24 PM2016-03-11T22:24:38+5:302016-03-11T22:24:38+5:30
जळगाव: पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती व व्हॉल्व दुरुस्ती अखेर शुक्रवारी पूर्ण झाल्याने रात्री उशिरा शहरातील काही भागात पाणीपुरवठा झाला. शनिवारी दुपारनंतर पाणीपुरवठा होणार आहे. चार दिवस पाणी न मिळाल्याने रहिवाशांचे अतोनात हाल झाले.
Next
ज गाव: पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीला लागलेली गळती व व्हॉल्व दुरुस्ती अखेर शुक्रवारी पूर्ण झाल्याने रात्री उशिरा शहरातील काही भागात पाणीपुरवठा झाला. शनिवारी दुपारनंतर पाणीपुरवठा होणार आहे. चार दिवस पाणी न मिळाल्याने रहिवाशांचे अतोनात हाल झाले. मनपाच्या वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या १२०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीला मेहरूणमधील रेणूका हॉस्पिटलसमोर लागलेल्या गळती दुरुस्तीचे काम मंगळवार, ८ रोजी दुपारी हाती घेतल्याने ९ रोजी होणारा पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर पडणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे जाहीर करण्यात आले होेते. गळती दुरुस्तीचे काम ३० तास सुरू राहणार होते. त्यामुळे ९ रोजीचा पाणीपुरवठा १० रोजी तर १० रोजीचा पाणीपुरवठा ११ रोजी होईल, असे जाहीर करण्यात आले ह ोते. मात्र गळती दुरुस्ती ठरलेल्या वेळेत होऊनही तेथील व्हॉल्व खराब झाल्याने तो उघडूच शकला नाही. त्यामुळे तो व्हॉल्व अखेर क्रेनच्या सहाय्याने काढण्यात येऊन थेट पाईप जोडून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे काम शुक्रवारी दुपारी १२ वाजता पूर्ण झाले. त्यानंतर उमाळे येथील एमबीआरमधून पाणी सोडण्यात आले. ते पाणी गिरणा टाकीपर्यंत पोहोचायला दोन-अडीच तास लागले. त्यानंतर गिरणा टाकी भरण्यात आली. तसेच त्यावरून इतर टाक्या भरून पाणीपुरवठा विभागाने जाहीर केलेल्या सुधारीत वेळापत्रकानुसार ९ रोजी पाणीपुरवठा होणार असलेल्या भागात ११ रोजी उशीराने पाणीपुरवठा करण्यात आला. तसेच १० रोजी पाणीपुरवठा होणार असलेल्या भागात १२ रोजी दुपारी उशीराने पाणीपुरवठा होणार असल्याचे पाणीपुरवठा विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले. तसेच पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक दोन दिवसांनी पुढे ढकलले गेले आहे. इन्फो-पर्यायी व्यवस्थेकडे सोयीस्करपणे दुर्लक्षवाघूर पाणीपुरवठा योजनेच्या जलवाहिनीच्या गळती दुरुस्तीचे काम व्हॉल्वच्या बिघाडामुळे लांबल्याने ७ रोजी पाणीपुरवठा झालेल्या भागांमध्ये गेल्या चार दिवसांपासून पाणीपुरवठा होऊ शकलेला नाही. तर काही भागांमध्ये तीन दिवसांपासून पाणीपुरवठा झालेला नाही. मनपा प्रशासनाने मात्र पाण्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत असून पिण्याच्या पाण्यासाठी देखील भटकंती करण्याची वेळ आली आहे.