मांजरा धरणातील पाणी उपसा एक दिवसासाठी बंद नव्या पंपाची चाचणी : आठवड्यातून दोन वेळा पाणी
By admin | Published: January 31, 2017 02:06 AM2017-01-31T02:06:43+5:302017-01-31T02:06:43+5:30
लातूर : मांजरा धरणावरील रोहित्र बसविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, नव्या पंपाची चाचणी घेण्यासाठी आज पाणीउपसा बंद राहणार आहे़ सोमवारी दिवसभर चाचणी घेतल्यानंतर दोन पंपाद्वारे लातूरसाठी पाणी उचलण्यात येणार आहे़ आठवड्यातून दोन वेळा पाणी देण्यासाठी हे पंप चालू करण्यात येत आहेत़
Next
ल तूर : मांजरा धरणावरील रोहित्र बसविण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, नव्या पंपाची चाचणी घेण्यासाठी आज पाणीउपसा बंद राहणार आहे़ सोमवारी दिवसभर चाचणी घेतल्यानंतर दोन पंपाद्वारे लातूरसाठी पाणी उचलण्यात येणार आहे़ आठवड्यातून दोन वेळा पाणी देण्यासाठी हे पंप चालू करण्यात येत आहेत़२० जानेवारी पासून आठवड्यातून दोन वेळा पाणी देण्याचे नियोजन मनपाने केले होते़ मात्र मांजरा प्रकल्पावर असलेल्या रोहित्राची चोरी झाली होती़ त्यामुळे नवे रोहित्र बसविण्याचे काम वेळेत होऊ शकले नाही़ परिणामी,आठवड्याला दोन वेळा पाणी देण्याचे नियोजन कोलमडले होते़ आता रोहित्र बसविण्याचे काम पूर्ण झाले असून, दोन पंपाद्वारे पाणी उपसा होणार आहे़ त्याच्या चाचणीसाठी सोमवारी दोन्हीही पंप बंद ठेवले जाणार आहेत़ तांत्रिक चाचणी पूर्ण झाल्यानंतर ५० ते ५५ एमएलडी दररोज पाणी मांजरा प्रकल्पातून उचलले जाणार आहे़ मांजरा प्रकल्पातील ५० एमएलडी आणि साई, नागझरी येथील २० एमएलडी, असे एकूण ७० एमएलडी दररोज पाणी उचलून ४ दिवसाआड लातूर शहराला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे़ त्याचे वेळापत्रक तयार आहे़ परंतु, हे वेळापत्रक जाहीर न करता आठवड्याला दोन वेळा पाणी देण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ मंगळवारपासून होणार आहे़ मांजरा प्रकल्पावर रोहित्र आता पूर्ण क्षमतेने सुरू झाले आहे़ त्यामुळे दोन्हीही पंप सुरू राहतील़ तांत्रिक तज्ञांमार्फत या पंपाची चाचणी घेण्याला सोमवारीच प्रारंभ होणार आहे़ एकदा चाचणी झाल्यानंतर आणि आठवड्यात दोन वेळा पाणी देण्याची एक फेरी पूर्ण झाल्यानंतर वेळापत्रक जाहीर केले जाईल़ त्या वेळापत्रकानुसार पाण्याचे वितरण होईल, असे मनपातून सांगण्यात आले़