ऐन चतुर्थीत मास्तीमळ भागात पाण्याचा ठणठणाट

By Admin | Published: September 20, 2015 12:53 AM2015-09-20T00:53:46+5:302015-09-20T00:53:46+5:30

काणकोण : ऐन चतुर्थीच्या दिवशी मास्तीमळ भागातील नळ कोरडे राहिल्याने या भागातील रहिवाशांची तीव्र संताप व्यक्त केला आहे. गुरुवार, दि. 17 रोजी व शुक्रवार, दि. 18 रोजी या भागातील नळांना पाणी आले नाही. मागच्या दिवसांत दि. 16 पर्यंत मास्तीमळ भागात रोज पाणी येत होते; पण ऐन चतुर्थीच्या व पंचमीच्या या मुख्य उत्सवाच्या दिवशी या भागाला पाणीपुरवठा झाला नाही, अशा प्रकारे उत्सवाच्या वेळी पाणी न आल्याने चतुर्थीच्या उत्साहावर विरजण पडले.

Water tightening in the fourth part of the fishery area | ऐन चतुर्थीत मास्तीमळ भागात पाण्याचा ठणठणाट

ऐन चतुर्थीत मास्तीमळ भागात पाण्याचा ठणठणाट

googlenewsNext
शिक : कुंभमेळ्याचे औचित्य साधून महापालिकेने खासगीकरणातून सूचना प्रसारणासाठी एलईडी वॉलची सुविधा दिली खरी; परंतु सूचनांपलीकडे त्याची फारशी गरज भासली नाही. दुसरीकडे या वॉल नागरिकांच्या सोयीपेक्षा जाहिरातीच्या सोयीने कुंभमेळा नसलेल्या भागात बसविल्याने त्याचा पालिकेला फारसा उपयोगच झाला नाही.
कुंभमेळ्याच्या प्रत्येक पर्वणीसाठी एक कोटींहून अधिक भाविक येणार असल्याने प्रत्येक संस्थेने त्याकडे काही ना काही करण्याची तयारी दर्शविली होती. त्याचाच लाभ उठवत काहींनी पालिकेकडे प्रस्ताव सादर केला आणि त्यानुसार महापालिकेने एका संस्थेस एलईडी वॉल बसविण्याची सोय करून दिली होती. त्यानुसार महापालिकेने एका संस्थेने ७५ वॉल उभारण्याची तयारी दर्शविली होती. या वॉलवर महापालिका आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने भाविकांना केल्या जाणार्‍या सूचना प्रदर्शित केल्या जाणार होत्या. ८ बाय १२ चौरस फूट आकारमानाच्या या वॉल लावण्यात आल्या होत्या. मात्र त्यातील ६२ टक्के वेळ सूचना, तर उर्वरीत वेळी जाहिरातींसाठी वेळ राखून ठेवण्यात आला होता. प्रत्यक्षात भाविकांची संख्येचे गणित बघता त्याचा फारसा उपयोग झाला नाही. त्यातच अनेक वॉल या भाविकांपेक्षा जाहिरातदारांच्या सोयीने उभारल्या असाव्या, अशी शक्यता आहे. कॅनडा कॉर्नर परिसरात कुंभमेळ्यासाठी भाविक येणार नसतानाही तेथे वॉल लावून ठेवण्यात आली. गोदाघाटांवर काही ठिकाणी अशाप्रकारच्या लावलेल्या वॉलही फारशा उपयुक्त ठरल्या नाही. गर्दीमुळे झटपट स्नान करून पुन्हा माघारी परतण्याची तयारीत असलेल्या नागरिकांना घाटावर थांबून वॉल बघण्या इतपत वेळही नव्हता. त्यामुळे या वॉलचा फार फायदा झाला नाही.

Web Title: Water tightening in the fourth part of the fishery area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.