मोठी दुर्घटना टळली, विमानाला पाण्याच्या टँकरची धडक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2018 03:33 PM2018-11-01T15:33:49+5:302018-11-01T15:35:47+5:30
कोलकाता विमानतळावर 100 हून अधिक प्रवासी थोडक्यात बचावले. गुरुवारी सकाळी विमानतळार कतार एअरवेज कंपनीच्या विमानाला उड्डाण घेत असताना एका पाण्याच्या टँकरने धडक दिली.
कोलकाता : कोलकाता विमानतळावर 100 हून अधिक प्रवासी थोडक्यात बचावले. गुरुवारी सकाळी विमानतळार कतार एअरवेज कंपनीच्या विमानाला उड्डाण घेत असताना एका पाण्याच्या टँकरने धडक दिली. या घटनेनंतर विमान लगेच विमानतळावर उतरविण्यात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली.
एका अधिकाऱ्याने सांगितले की, गुरुवारी सकाळी दुपारी अडीज वाजताच्या सुमारास ही घटना घडली. कतार एअरवेज कंपनीचे विमान प्रवाशांना घेऊन उड्डाण घेत असताना एका पाण्याचा टँकरने धडक दिली. टँकरच्या धडकेनंतर विमानाच्या पायलटने त्वरित विमान खाली उतरविले. त्यानंतर विमानाचे निरीक्षण करण्यात आले आणि विमानातील प्रवाशांना खाली उतरविले.
सर्व प्रवासी सुरक्षित...
कतार एअरवेज विमानात 103 प्रवासी होते. या घटनेनंतर काही प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, सर्व प्रवासी सुरक्षित आहे. त्यांची जवळच्याच हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली असून आता प्रवाशांना शुक्रवारी सकाळी तीन वाजता रवाना करण्यात येणार आहे, असे येथील अधिकाऱ्यांनी सांगितले.
चौकशी समिती स्थापन...
डीजीसीएच्या सुत्रांनी सांगितले की, या घटनेची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीकडून चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाई करण्यात येणार आहे.