५ दिवसांनी मिळणार पाणी

By admin | Published: January 24, 2016 10:19 PM2016-01-24T22:19:59+5:302016-01-24T22:19:59+5:30

पाणीपुरवठा आणखी दोन दिवस लांबणीवर बातमीत चौकट

Water will be available after 5 days | ५ दिवसांनी मिळणार पाणी

५ दिवसांनी मिळणार पाणी

Next
णीपुरवठा आणखी दोन दिवस लांबणीवर बातमीत चौकट

इन्फो-
५ दिवसांनी मिळणार पाणी
शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यानुसार २३ रोजी नियमित वेळापत्रकानुसार ज्या भागात पाणीपुरवठा होणार होता, तेथे आता २६ रोजी पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. तर २४ रोजीचा पाणीपुरवठा २७ रोजी तर २५ रोजीचा पाणीपुरवठा २८ रोजी करण्यात येईल. पाणीपुरवठ्याचे वेळापत्रक आधी एक दिवस व नंतर दोन दिवस असे तीन दिवसांनी पुढे ढकलले गेले आहे. म्हणजेच नागरिकांना तब्बल ५ दिवसांनी पाणीपुरवठा होणार आहे.

इन्फो-
पर्यायी व्यवस्थाच नाही; नागरिकांचे हाल होणार
शहरात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यानुसार नागरिक पाण्याचा साठा करून ठेवतात. तो साठा एखादे दिवस पाणी आले नाही तरी पुरतो. मात्र दुरुस्तीच्या कामात विलंब झाल्याने एकदा पाणीपुरवठा झालेल्या भागात आता तब्बल ५ दिवसांनी पाणी मिळणार असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागणार आहे. झोपडप˜ी भागात तर पाणी साठवण्याची पुरेसी सोय नसल्याने त्यांची रविवारपासूनच पाण्यासाठी भटकंती सुरू झालेली दिसून आली. मनपाकडून मात्र पर्यायी व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.

इन्फो-
पर्यायी पाणीपुरवठा सुरूच-खडके यांचा दावा
शहरात पाणीटंचाईच्या काळात विहीरी, बोअरिंगवरून पाणीपुरवठ्याची योजना राबविण्यात आली होती. शहरातील ६०-६५ टक्के भागात ही योजना आजही कार्यान्वित असल्याचा दावा करीत त्याद्वारे नागरिकांना वापरासाठी पाणी उपलब्ध होईल, असे सांगितले. पिंप्राळा गावठाण, गवळीवाडा, वाल्मिकनगर, विठ्ठलपेठ आदी जास्त लोकवस्तीच्या भागात ही योजना सध्याही कार्यान्वित आहे. उर्वरीत भागात मात्र टँकरद्वारे पाणीपुरवठ्याची सोय मनपाने केलेली नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे काय? असा सवाल उपस्थित होत आहे. तसेच पाणीपुरवठा अभियंता यांनी दावा केलेल्या टक्केवारीतही तथ्य नसून महाबळ, रामानंदनगर परिसर, किसनरावनगर, तसेच इतरही अनेक भागात अशी पर्यायी व्यवस्थाच नाही. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होणार आहे.

---- कोट---
शहरातील अनेक भागात पूर्वीची पर्यायी योजना कार्यान्वित आहे. ज्या भागात ही व्यवस्था नाही, विशेषत: झोपडप˜ी भागात बोअरिंग नसेल अशा भागात अडचण निर्माण होईल. तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची सूचना केली जाईल. कॉलनी एरियात नागरिकांकडे स्वत:चे बोअरिंग, विहिर असल्याने जास्त अडचण येणार नाही.
-नितीन ल‹ा,
नेते, खाविआ

Web Title: Water will be available after 5 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.