नैनितालमध्ये झपाट्याने घटतेय पाणीपातळी

By Admin | Published: March 3, 2017 04:48 AM2017-03-03T04:48:47+5:302017-03-03T04:48:47+5:30

पर्यटकांचे खास आकर्षण समजल्या जाणाऱ्या उत्तराखंडमधील ‘नैनिताल लेक’येथे पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे.

Waterfall in Nainital | नैनितालमध्ये झपाट्याने घटतेय पाणीपातळी

नैनितालमध्ये झपाट्याने घटतेय पाणीपातळी

googlenewsNext


नैनिताल : पर्यटकांचे खास आकर्षण समजल्या जाणाऱ्या उत्तराखंडमधील ‘नैनिताल लेक’ येथे पाणी पातळी झपाट्याने कमी होत आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस येथील पाणी पातळी शून्याच्या खाली एक फूट गेली आहे. ज्या पाण्याच्या आकर्षणाने आणि येथील निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटक येथे येतात तेथील पाणी पातळी घटत असल्याने स्थानिक नागरिकांच्या काळजीत भर पडली आहे. याच सरोवरातून शहराला पाणी पुरवठा केला जातो. पाण्याचे अन्य मोठे स्त्रोत येथे नाही. गतवर्षी याच काळात येथे पाणी पातळी किमान पातळीच्या पाच ते सात फूट वरपर्यंत होती. पण, यंदा पाणी पातळी फे ब्रुवारीतच शून्याच्या खाली गेली आहे. कुमाउं विद्यापीठातील मानव संसाधन विभागाचे असोसिएट प्रोफेसर आणि पर्यावरण कार्यकर्ते रितेश शहा म्हणाले की, मागील वर्षी ‘अल निनो’चा प्रभाव जाणवला. वातावरणातील बदलाचा पर्यावरणाला फटका बसला. त्यामुळेच पाणी पातळीही कमी झाली आहे. २०१७ मध्ये असेच धोक्याचे संकेत मिळत आहेत. नैनिताल लेक परिसरात एक भयावह चित्र निर्माण होऊ शकते. सद्या कमी होणारी पाणी पातळी भविष्याचे संकेत देत आहे. नैनिताल येथील सरोवर पाण्याच्या नैसर्गिक भूमीगत स्त्रोतावर अवलंबून आहे. पाण्याची ही तूट पावसाने भरून निघू शकते का? हा प्रश्न येथील भविष्याशी जोडला गेलेला आहे.

Web Title: Waterfall in Nainital

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.