चिंताजनक! नोकरी सोडण्याची लाट अमेरिकेपाठोपाठ भारतातही येणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2022 05:57 AM2022-01-20T05:57:28+5:302022-01-20T06:00:00+5:30
कोरोनामुळे सर्वाधिक पोळल्या गेलेल्या अमेरिकेत गेल्या काही महिन्यांत राजीनाम्याची लाट आली आहे. अनेकांनी विविध कारणांमुळे आपल्या नोकरीला सोडचिठ्ठी देण्याचे प्रमाण तिकडे लक्षणीय प्रमाणात वाढले आहे.
कोरोनामुळे सर्वाधिक पोळल्या गेलेल्या अमेरिकेत गेल्या काही महिन्यांत राजीनाम्याची लाट आली आहे. अनेकांनी विविध कारणांमुळे आपल्या नोकरीला सोडचिठ्ठी देण्याचे प्रमाण तिकडे लक्षणीय प्रमाणात वाढले आहे. त्यास तिकडे आता ग्रेट रेझिग्नेशन असे संबोधले जात आहे. थोड्याफार प्रमाणात हा ट्रेण्ड आपल्याकडेही दिसू लागला आहे.
अमेरिकेतील चित्र
साधारणत: २०२० मध्ये अमेरिकेत राजीनामासत्राला सुरुवात झाली.
२०२१ मध्ये साडेसात कोटी अमेरिकी नागरिकांनी आपल्या नोकरीला रामराम केला.
राजीनामा दिलेल्यांपैकी २३ टक्के नागरिक यंदाच्या वर्षात नव्या नोकरीच्या शोधात असतील.
स्वागत क्षेत्र, आरोग्य, सामाजिक मदत, वाहतूक, वेअरहाऊसिंग या क्षेत्रातील लोकांचे नोकरी सोडण्याचे प्रमाण अधिक आहे.
नोकरीला सोडचिठ्ठी देण्याचे प्रमाण भारतात तुलनेने कमी असले तरी चिंताजनक आहे.
विशेषत: कमी पगारावर राबणाऱ्या लोकांनी राजीनामा देण्याचे प्रमाण अधिक आहे.
नोकरी सोडण्यामागे सध्याच्या नोकरीचा आलेला कंटाळा हे मुख्य कारण आहे.
नोकरी सोडण्याचे कारण
कमी वेतन : ६७%
करिअरमधील मर्यादित संधी : ६६%
वरिष्ठांकडून कामाची दखल घेतली न जाणे : ६५%
सहकाऱ्यांशी संबंध - ६४%
आरोग्याची देखभाल घेतली न गेल्याने : ६४%
कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या अपुऱ्या सोयीसुविधा : ६४%
अन्य क्षेत्रात नशीब आजमावण्यासाठी : ६२%
सहकारी सोडून गेले म्हणून - ५४%
५१%लोक तर कोणताही अनुभव नसलेल्या क्षेत्रात नोकरी शोधत असल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.