देशातील ४०हून अधिक बोलीभाषा लुप्त होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2018 01:52 AM2018-02-19T01:52:14+5:302018-02-19T03:16:46+5:30
ज्यांचा दैनंदिन व्यवहारांत जेमतेम काही हजार लोक नियमितपणे वापर करतात अशा भारतात ४० हून अधिक भाषा व बोलीभाषा असून अत्यल्प वापरामुळे नजिकच्या भविष्यात या भाषा कायमच्या लुप्त होण्याची शक्यता आहे
नवी दिल्ली : ज्यांचा दैनंदिन व्यवहारांत जेमतेम काही हजार लोक नियमितपणे वापर करतात अशा भारतात ४० हून अधिक भाषा व बोलीभाषा असून अत्यल्प वापरामुळे नजिकच्या भविष्यात या भाषा कायमच्या लुप्त होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रातील ‘निहाली’
या बोलीभाषेचाही यात समावेश आहे.
जनगणना संचालनालयाच्या अहवालानुसार प्रत्येकी एक लाख किंवा त्याहून अधिक लोक दैनंदिन व्यवहारात वापर करतात अशा भारतात राज्यघटनेच्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या २२ व परिशिष्टात समावेश नसलेल्या १०० हून अधिक भाषा व बोलीभाषा आहेत.
गृह मंत्रालयाच्या अधिकाºयांनुसार यापैकी ४२ भाषा व बोलीभाषांचा दैनंदिन व्यवहारात वापर करणाºयांची संख्या १० हजारांहून कमी असलयने या भाषा अस्तंगत होण्याच्या मार्गावर असल्याचे मानले जाते. संयुक्त राष्ट्र संघाच्या ‘युनेस्को’नेही भारतामधील ४२ भाषा नष्ट होण्याचा धोका असल्याचे त्यांच्या अहवालात नमूद केले आहे.
भाषांच्या संवर्धनाचे म्हैसूरमध्ये काम
म्हैसूर येथील ‘सेंट्रल इन्स्टिट्यूट आॅफ इंडियन लॅग्वेजेस’ मध्ये
केंद्र सरकारच्या एका योजनेनुसार नष्टतेच्या मार्गावर असलेल्या भारतीय भाषांचे जतन व संवर्धन करण्याचे काम केले जात आहे. त्यानुसार, अशा भाषांचे व्याकरण, बहुभाषिक शब्दकोश, या भाषांचा लोकसाहित्यांत वापर आणि भाषिक ज्ञानकोष तयार करण्याचे काम तेथे केले जात आहे.
नष्ट होण्याचा धोका असलेल्या भाषा
ग्रेट अंदमानीज, जारवा, लॅमाँंग्से, ल्युरो, मुओत, ओंगे, पु, सानेन्यो, सेंटिलिज, शॉम्पेन आणि ताकाहानयिलांग (अंदमान व निकोबार बेटे), आयमो, आका, कोयरेन, लामगांग, लांगराँग, पुरुम व ताराओ (मणिपूर), बघाती, हांदुरी, पांगवली व सिरमौडी (हिमाचल प्रदेश), मंडा, परजी व पेंगो (ओडिशा), कोराबा आणि कुरुगा (कर्नाटक), गडाबा आणि नाईकी (आंध्र प्रदेश), कोटाव तोडा (तमिळनाडू), म्रा व ना (अरुणाचल प्रदेश), ताई नोरा व ताई रोंग (आसाम), बांगानी (उत्तराखंड), बिरहोर (झारखंड), नि६ाली (महाराष्ट्र), रुगा (मेघालय) आणि तोटो (प. बंगाल).
२२ भाषा सर्वाधिक बोलल्या : राज्यघटनेच्या परिशिष्टात समाविष्ट असलेल्या २२ भाषांखेरीज आणखी ३१
भाषांना विविध राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये राज्यभाषेचा दर्जा आहे. जनगणनेच्या आकडेवारीनुसार देशात सर्वाधिक बोलल्या जाणाºया २२ प्रमुख भाषा आहेत. त्याखेरीज अन्य १,६३५ भाषा विविध समाजांच्या मातृभाषा आहेत.