WB Election 2021: पंतप्रधान मोदी राहणार बांगलादेशात, परिणाम होणार बंगालच्या निवडणुकीवर; असा आहे भाजपचा 'प्लॅन B'!

By श्रीकृष्ण अंकुश | Published: March 3, 2021 01:51 PM2021-03-03T13:51:56+5:302021-03-03T13:59:17+5:30

गेल्या वर्षी मार्च महिन्यातच पंतप्रधानांचा बांगलादेश दौरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता. मात्र, आता मोदींच्या या दौऱ्याचे धागे थेट पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीशी जोडले गेले आहेत. (WB Election 2021)

WB Election 2021: Prime Mnister Narendra Modi Bangladesh visit may effect west bengal assembly election | WB Election 2021: पंतप्रधान मोदी राहणार बांगलादेशात, परिणाम होणार बंगालच्या निवडणुकीवर; असा आहे भाजपचा 'प्लॅन B'!

WB Election 2021: पंतप्रधान मोदी राहणार बांगलादेशात, परिणाम होणार बंगालच्या निवडणुकीवर; असा आहे भाजपचा 'प्लॅन B'!

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना महामारीच्या काळात हा पंतप्रधान मोदींचा पहिलाच परदेश दौरा आहे.गेल्या वर्षी मार्च महिन्यातच पंतप्रधानांचा बांगलादेश दौरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता.आता मोदींच्या या दौऱ्याचे धागे थेट पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीशी जोडले गेले आहेत.

कोलकाता - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Narendra Modi) 26-27 मार्चला बांगलादेश दौऱ्यावर आहेत. कोरोना महामारीच्या काळात हा पंतप्रधान मोदींचा पहिलाच परदेश दौरा आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यातच पंतप्रधानांचा बांगलादेश (Bangladesh) दौरा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्यात आला होता. मात्र, आता मोदींच्या या दौऱ्याचे धागे थेट पश्चिम बंगाल (West Bengal) विधानसभा निवडणुकीशी जोडले गेले आहेत. 27 तारखेला मोदी मतुआ समाजाशी संबंधित असलेल्या काही ठिकानांना भेटी देतील. निवडणुकीदरम्यान बंगालमधील 70 हून अधिक जागांवर हाच मतुआ समाज महत्वाची भूमिका बजावतो. (Prime Mnister Narendra Modi Bangladesh visit may effect west bengal assembly election)

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भाषणं लिहितं तरी कोण?; अखेर उत्तर मिळालं

पंतप्रधान मोदी 27 मार्चला बांगलादेशातील गोपालगंज येथे मतुआ समाजाचे धर्मगुरू हरिचंद्र ठाकूर यांच्या जन्‍मस्‍थळाला तसेच इतर काही तीर्थ स्थळांना भेट देणार आहेत. या स्थळांना भेट देणारे पंतप्रधान मोदी हे भारताचे पहिलेच पंतप्रधान असतील. यावेळी बनगावचे भाजप खासदार आणि मतुआ समाजाचे प्रतिनिधी शांतनू ठाकूरही मोदींच्या सोबत असण्याची शक्यता आहे. शांतनू हे हरिचंद्र ठाकूर यांचे वंशज आहेत. याच बरोबर मोदी मतुआ समाजाच्या नागरिकतेसंदर्भातही काही घोषा करण्याचा शक्यता आहे.

पंतप्रधा मोदींची मतुआ मठाला भेट -
2019च्या लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदींनी पश्चिम बंगालमध्ये निवडणूक प्रचाराला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम मतुआ समाजाच्या 100 वर्षांपूर्वीच्या मठात जाऊन बोरो मां यांचे दर्शण घेतले होते. भाजपने बोरो मां यांचे नातून असलेले शांतनू ठाकूर यांना आपले उमेदवार केले होते आणि भाजप पहिल्यांदाच बोंगन लोकसभा मतदारसंघाची जागा जिंकला होता. याच पद्धतीने केंद्रीय गृह मंत्री अमित शाह डिसेंबरमध्ये जेव्हा पश्चिम बंगालमध्ये आले होते. तेव्हा त्यांनी मतुआ समाजाच्या व्यक्तीच्या घरीच भोजन केले होते. 

सौरव गांगुली PM मोदींच्या रॅलीतून राजकीय इनिंग सुरू करणार?; भाजपने केले स्पष्ट

बंगालच्या राजकारणात मतुआ समाज महत्वाचा - 
पश्चिम बंगालच्या राजकारणात मतुआ समाज अत्यंत महत्वाचा आहे. आदिवासी आणि अनुसूचित जाती-जनजातीच्या लोकांवर लक्ष ठेऊन आपले मिशन-200 पूर्ण करण्याची भाजपची इच्छा आहे. 2011च्या जनगणनेनुसार, पश्चिम बंगालमध्ये अनुसूचित जातीच्या समाजाची लोकसंख्या जवळपास 1.84 कोटी आहे. तर यात 50 टक्के लोक मतुआ समाजाचे आहेत.

भाजपने आणलेला CAA कायदाही मतुआ समाजाच्या हिताचा आहे. हा कायदा लागू झाल्यास या समाजाच्या लोकांना भारताचे नागरिकत्व मिळणार आहे. विशेष म्हणजे भाजपही येथील विधानसभा निवडणूक प्रचारात या मुद्द्याचा वापर करताना दिसत आहे. यामुळे मोदींच्या या बांगलादेश दौऱ्याचा बंगालच्या निवडणुकीवरही थेट परिणाम पडण्याची शक्यता आहे.

गुजरात : जिल्हा परिषद निवडणुकांत काँग्रेसचा 'सुपडा साफ', सर्वच्या सर्व 31 जागांवर भजपचा विजय

 

Web Title: WB Election 2021: Prime Mnister Narendra Modi Bangladesh visit may effect west bengal assembly election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.