West Bengal: “ममता बॅनर्जींनी सांगितलं तसं केलं”; अलपन बंडोपाध्याय यांचं केंद्राला उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2021 09:28 PM2021-06-03T21:28:37+5:302021-06-03T21:29:31+5:30

West Bengal: केंद्राने अलपन बंडोपाध्याय यांना नोटीस बजावली होती.

wb former chief secretary alapan bandyopadhyay has replied to show cause notice issued by centre govt | West Bengal: “ममता बॅनर्जींनी सांगितलं तसं केलं”; अलपन बंडोपाध्याय यांचं केंद्राला उत्तर

West Bengal: “ममता बॅनर्जींनी सांगितलं तसं केलं”; अलपन बंडोपाध्याय यांचं केंद्राला उत्तर

Next
ठळक मुद्देलपन बंडोपाध्याय यांचं केंद्राला उत्तरममता बॅनर्जींनी सांगितलं तसं केलं - बंडोपाध्याय

कोलकाता:पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांनंतर केंद्र सरकार आणि ममता बॅनर्जी यांच्यातील संघर्ष अधिक तीव्र होताना पाहायला मिळत आहे. केंद्र सरकारने मुख्य सचिव अलपन यांना केंद्रात परत येण्याचे आदेश देत बदली केली होती. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी खेळी खेळत अलपन बंडोपाध्याय यांना आपला मुख्य सल्लागार बनविण्याची घोषणा केली. यावरून केंद्राने अलपन बंडोपाध्याय यांना नोटीस बजावली होती. ममता बॅनर्जींनी सांगितलं तसं केलं, असं उत्तर अलपन बंडोपाध्याय यांनी दिल्याची माहिती मिळाली आहे. (former chief secretary alapan bandyopadhyay has replied to show cause notice issued by centre govt)

अलपन बंडोपाध्याय ३१ मे पासून सेवानिवृत्त होत असले तरी त्यांना असेच सोडणार नाही. सेवानिवृत्त झाले असले तरी, ते दिल्लीला जाणार नाहीत, ते आता मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार असतील. अलपन बंडोपाध्याय १ जूनपासून मुख्यमंत्र्यांचे मुख्य सल्लागार म्हणून कार्यभार स्वीकारतील, अशी घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती. यानंतर केंद्र सरकारने बंडोपाध्याय यांना नोटीस बजावत उत्तर देण्याचे निर्देश दिले होते. 

ममता बॅनर्जींनी सांगितलं तसं केलं

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अलपन बंडोपाध्याय यांनी केंद्राच्या नोटिसीला उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जसे सांगितले तसेच केले. समीक्षा बैठकीसंदर्भात बोलताना अलपन बंडोपाध्याय यांनी सांगितले की, त्या दिवशी ते ममता बॅनर्जी यांच्यासोबत होते आणि उत्तर तसेच दक्षिण २४ परगणा भागाचे हवाई सर्वेक्षण करत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आढावा बैठकीनंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या परवानगीने दिघा येथे गेले होते, असे बंडोपाध्याय यांनी नोटिसीला दिलेल्या उत्तरात म्हटल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे. 

कोव्हॅक्सिनच्या लसीची २ ते १८ वयोगटातील मुलांवर ट्रायल सुरू; ३ जणांना दिला पहिला डोस

दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आलेल्या यास चक्रीवादळानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगालमधील अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली होती. मात्र मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि मुख्य सचिव अलपन बंडोपाध्याय यांनी अर्धा तास उशिरा हजेरी लावली. तसेच अहवाल दिल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी दुसऱ्या कार्यक्रमात जायचे आहे, असे सांगून निघून गेल्या होत्या. परिणामी केंद्र सरकारने मुख्य सचिव अलपन यांना केंद्रात परत येण्याचे आदेश देत बदली केली होती. मात्र, आता त्यांची केंद्रात बदली होऊ द्यायची नाही, यासाठी ममता बॅनर्जी यांनी नवी खेळी खेळल्याचे सांगितले जात आहे. 
 

Web Title: wb former chief secretary alapan bandyopadhyay has replied to show cause notice issued by centre govt

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.