Citizen Amendment Bill : तुम्ही ज्या शाळेत शिकता, त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर; संजय राऊतांचा भाजपाला टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 03:57 PM2019-12-11T15:57:34+5:302019-12-11T16:00:26+5:30

Citizen Amendment Bill : गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा विधेयकाची जोरदार चर्चा सुरू आहे.

We are the Headmaster of the school you are attending; Sanjay Rauta's BJP tola | Citizen Amendment Bill : तुम्ही ज्या शाळेत शिकता, त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर; संजय राऊतांचा भाजपाला टोला

Citizen Amendment Bill : तुम्ही ज्या शाळेत शिकता, त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर; संजय राऊतांचा भाजपाला टोला

googlenewsNext

नवी दिल्लीः गेल्या काही दिवसांपासून नागरिकत्व सुधारणा विधेयकाची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभेत हे विधेयक मंजूर झाल्यानंतर राज्यसभेत विधेयकाची अग्निपरीक्षा सुरू आहे. शिवसेना आणि जेडीयूनं या विधेयकाला लोकसभेत पाठिंबा दिला होता. त्यानंतर शिवसेनेनं भूमिकेत अचानक बदल केला असून, जोपर्यंत विधेयकासंदर्भात आम्ही उपस्थित केलेल्या प्रश्नांचं निरसन होत नाही, तोपर्यंत विधेयकाला पाठिंबा देणार नसल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलेलं आहे. काँग्रेसच्या दबावामुळेच शिवसेनेनं भूमिकेत बदल केल्याचा आरोप भाजपाकडून करण्यात आलेला आहे.

राज्यसभेत हे विधेयक मांडले असता, शिवसेनेच्या संजय राऊतांनी या विधेयकावर भाष्य केलं आहे. हिंदुत्वावरून शिवसेनेला करण्यात येत असलेल्या लक्ष्यावरून त्यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. 


आम्हाला हिंदुत्व आणि राष्ट्रीयत्वासाठी कोणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. तुम्ही ज्या शाळेत शिकता, त्या शाळेचे आम्ही हेडमास्तर आहोत. आमच्या शाळेचे हेडमास्तर बाळासाहेब ठाकरे, अटलबिहारी वाजपेयी आणि श्यामाप्रसाद मुखर्जी होते. आम्ही त्या सगळ्यांनाच आदर्श मानतो.
तसेच संजय राऊतांनी राज्यसभेत या विधेयकासंदर्भात काही प्रश्नही उपस्थित केले आहेत. या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर तुम्ही घसखोरांना बाहेर काढणार आहात का?, जर तुम्ही शरणार्थींना स्वीकारत असाल तर त्या मुद्द्यावर कोणतंही राजकारण होता कामा नये. त्यांना मतदानाचा अधिकार मिळणार आहे का?, असा प्रश्नही राऊतांनी उपस्थित केला आहे. तसेच मी कालपासून ऐकतो आहे की विधेयकाला पाठिंबा देणार राष्ट्रभक्त आणि विरोध करणारे देशविरोधी असल्याचा आरोप केला जात आहे. पण आम्हाला कोणाकडूनही राष्ट्रभक्तीचं सर्टिफिकेट नको, असं म्हणत संजय राऊतांनी भाजपावर निशाणा साधला आहे.

 

Web Title: We are the Headmaster of the school you are attending; Sanjay Rauta's BJP tola

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.